मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. आज झालेल्या बहुमत चाचणी देखील भाजप आणि शिंदे गटाने जिंकली आहे. तसेच काल विधानसभा अध्यक्षपदासाठी देखील भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. यातच आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकमताने विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली आहे.
“शिवसेनेचा कार्यकर्ता 20 रुपयांचा वडापाव खावून प्रचार करतो”; बंडखोर आमदाराचं वक्तव्य
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काल राष्ट्रवादीची बैठक पार पडली. यामध्ये विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने अजित पवार यांच्या नावावर शिक्कामार्तोब केला आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची अजित पवारांनी तर अजित पवारांची खुर्ची देवेंद्र फडणवीसांनी घेतल्याने एकच चर्चा रंगली आहे.
आरे मेट्रो कारशेडबाबत आता मनसेचा प्रंचड विरोध; अमित ठाकरेंची सनसनीत पोस्ट
शिंदे सरकारला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षनेता कोण असायला हवा? याची चर्चा सध्या रंगली होती. यामध्ये जयंत पाटील, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र विरोधी पक्षनेता निवड समितीने अजित पवारांची निवड केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षाची तर अजित पवार उपमुख्यमंत्री होते.
आदित्य ठाकरे पक्षातील घाण गेली म्हणतात, अन् ठाकरे बंडखोर आमदारांना आवाहन करतात
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आमदारांचं विधिमंडळात भाषण झालं. यामध्ये सर्वपक्षीय आमदारांनी एकमेकांवर चिखलफेक केली. तर बंडखोर आमदारांनी देखील जोरदार भाषणं केलीत. देवेंद्र फडणवीस या सगळ्या आमदारांमध्ये सगळ्यात नशीबवान आहेत. कारण त्यांनी या अडीच वर्षात मुख्यमंत्री पद, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री पद भुषवलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी सगळी महत्वाची खातं भुषवली आहेत असा टोला देखील अजित पवार यांनी लगावला.
Read also
- “लक्षात ठेवा..! भुजबळ, राणे साहेबांनी शिवसेना फोडल्यानंतर एकही आमदार निवडून आला नाही”
- “मी पुन्हा आलो पण येतांना एकनाथ शिंदेंना घेऊन आलो”
- एकनाथ शिंदेंकडील लोकं इडीमुळेच आमच्याकडे आलेत; देवेंद्र फडणवीस
- शिंदे सरकारने बहुमत जिंकलं; भाजप शिंदे गटाला 164 तर दोन आमदार तटस्थ
- राहुल नार्वेकर देशातील तरूण विधानसभा अध्यक्ष; देवेंद्र फडणवीस