मुंबई : आज विधानभवनात बंडखोर आमदारांनी सभागृहात जोरदार भाषणं केलीत. अजित पवारांनी देखील चांगलीच टोलेबाजी करत बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे. यातच बंडखोर आमदार आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी देखील भाषण केलं. त्यांनी सभागृहात संजय राऊतांवर निशाणा साधताना एक प्रकारे इशाराही दिला आहे.
राहुल नार्वेकर देशातील तरूण विधानसभा अध्यक्ष; देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आम्ही मातोश्रीवर गेलो. त्यावेळी आम्ही म्हटले की, एकदा एकनाथ शिंदेंची बाजू ऐकुन घ्या. तेव्हा संजय राऊतांनी म्हटले की तुम्हालाही तिकडे जायचे असेल तर जा. आम्हाला गटारातील घाण, डुक्कर म्हटलं गेलं. ज्यांची लोकांमधून निवडून यायची लायकी नाही. ते आम्हाला बोलतात. आम्हाला डुक्कर बोलता आणि आमच्याच मतांवर खासदार म्हणून निवडून जात. हे कोण सहन करणार? असा देखील सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.
“शिवसेनेचा कार्यकर्ता 20 रुपयांचा वडापाव खावून प्रचार करतो”; बंडखोर आमदाराचं वक्तव्य
शिवसेना सोडून बाहेर पडण्यात केवढा मोठा धोका आहे, हे आम्हालाही माहिती आहे. एकीकडे काॅंग्रेस-राष्ट्रवादीसारखे विरोधी पक्ष दुसऱ्या बाजूला अडीच वर्षे ज्या भाजपशी जमलं नाही ते आहेत. मात्र, आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. आम्ही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली या गोष्टीचं आम्हाला दु:ख आहे. ही गोष्ट आमच्या मनातही सलत आहे. पण उद्धव ठाकरे यांच्याभोवती असलेल्या चार लोकांच्या कोंडाळ्याने त्यांना बावळट बनवले आहे. असंही ते म्हणाले.
आरे मेट्रो कारशेडबाबत आता मनसेचा प्रंचड विरोध; अमित ठाकरेंची सनसनीत पोस्ट
दरम्यान, शिंदे सरकारला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षनेता कोण असायला हवा? याची चर्चा सध्या रंगली होती. यामध्ये जयंत पाटील, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र विरोधी पक्षनेता निवड समितीने अजित पवारांची निवड केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षाची तर अजित पवार उपमुख्यमंत्री होते.
Read also
- अजित पवारांची खुर्ची आता फडणवीसांना अन् फडणवीसांची खुर्ची अजित पवारांना
- “लक्षात ठेवा..! भुजबळ, राणे साहेबांनी शिवसेना फोडल्यानंतर एकही आमदार निवडून आला नाही”
- “मी पुन्हा आलो पण येतांना एकनाथ शिंदेंना घेऊन आलो”
- एकनाथ शिंदेंकडील लोकं इडीमुळेच आमच्याकडे आलेत; देवेंद्र फडणवीस
- शिंदे सरकारने बहुमत जिंकलं; भाजप शिंदे गटाला 164 तर दोन आमदार तटस्थ