मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बंडखोरांचं जंगी स्वागत केलं जात आहे. काल मध्यरात्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांचं घरी जोरदार स्वागत केले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नागपुरात दाखल झालेत. याच पार्श्वभूमीवर आता काॅंग्रेसने बंडखोर आणि एकनाथ शिंदे तसेच भाजपवर निशाणा साधला आहे.
“शिंदे साहेबांची बुलेट ट्रेन काही थांबली नाही”; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर फटकेबाजी
‘दुर्योधन’ म्हणजे वाईट मार्गाने मिळवलेले धन व ‘दु:शासन’ म्हणजेच मोदी सरकारच्या अत्याचारी व कुटील शासन या दोन्हींनी मिळून केलेल्या लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या जल्लोषात जनतेची घृणा वाढत आहे हे लक्षात ठेवा. असं काॅंग्रेस नेते सचिन सांवत यांनी म्हटले आहे. त्यावर आता शिवसेना आणि भाजप काय प्रतिक्रिया देणार ते आता पहावं लागणार आहे.
..तर मी जगाचा निरोप घेईल; एकनाथ शिंदेंनी दिला शब्द ! वाचा सविस्तर भाषण
गेली अडीच वर्षे भाजपाने सत्तेच्या वेडापायी अत्यंत खालच्या दर्जाची भाषा व राजकारण करून महाराष्ट्राचे राजकारण नासवले. विरोधी पक्ष कसा नसावा याचे उदाहरण दिले. आता पुन्हा सकारात्मक विरोध कसा करावा याचे उदाहरण देऊन महाराष्ट्राच्या आदर्श राजकीय परंपरेची पुनर्स्थापना करावी लागेल. असं ते म्हणाले. काल विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी अजित पवारांची निवड करण्यात आली आहे.
“एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिंमत करणारा अजून पैदा झालेला नाही”
दरम्यान, शिवसेनेच्या तसेच अपक्ष 50 आमदार जरी पुढच्या निवडणुकीत निवडून आले नाहीत तर गावाकडे जाऊन शेती करणार. या सर्व बंडखोर आमदारांना निवडणुकीत निवडून आणणे ही माझी जबाबदारी असेल, असं वक्तव्य काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलं. त्यांच्या भाषणाचं अनेकांनी कौतुक केलं तर काहींनी त्यांच्यावर टिका केली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांना खोचक टोला लगावला आहे.
Read also
- “तुमच्या 50 लबाडांना शेती सोसणार नाही, त्यापेक्षा पाटलांसोबत हिमालयात जा”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “तर आम्ही तुमच्या पाया पण पडू”; अजित दादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर निलेश राणेंची प्रतिक्रिया
- त्यामुळेच आदित्य ठाकरेंना अपात्रतेची नोटीस पाठवली नाही; सेनेच्या 14 आमदारांना नोटीस
- “आज सर्वच पक्षातील व अपक्ष आमदार इडी शाहीला टरकलेले आहेत” हरी नरके
- मुख्यमंत्र्यांनी आज केल्या तीन महत्वाच्या घोषणा; तालिका अध्यक्षांची देखील जाहीर केलीत नावे