मुंबई : शिवसेनेच्या तसेच अपक्ष 50 आमदार जरी पुढच्या निवडणुकीत निवडून आले नाहीत तर गावाकडे जाऊन शेती करणार. या सर्व बंडखोर आमदारांना निवडणुकीत निवडून आणणे ही माझी जबाबदारी असेल, असं वक्तव्य काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलं. त्यांच्या भाषणाचं अनेकांनी कौतुक केलं तर काहींनी त्यांच्यावर टिका केली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांना खोचक टोला लगावला आहे.
..तर मी जगाचा निरोप घेईल; एकनाथ शिंदेंनी दिला शब्द ! वाचा सविस्तर भाषण
प्रशांत जगताप म्हणाले की, शेती करणं सोपं नाही. काळ्या आईशी इमान राखणारे, मातीशी एकनिष्ठ असणारे धैर्यवान शेती करतात. एखादा दुष्काळ, एखादी अतिवृष्टी झाली की मातीशी गद्दारी करणारा शेतकरी नसतो. तुमच्या 50 लबाडांना शेती सोसणार नाही. त्यापेक्षा चंद्रकांत पाटलांसोबत तुम्हीही हिमालयात जा. असा खोचक टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
“एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिंमत करणारा अजून पैदा झालेला नाही”
कोल्हापुरातील पोटनिवडणुकीच्या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी देखील अगोदर म्हटलं होतं की, या निवडणुकीत विजयी झालो नाही तर हिमालयात जाणार. मात्र त्यानंतर त्यांचा पराभव झाला आणि वेगळचं कारण देत त्यांनी हा मुद्दा मिटवला. त्याचाच आधार घेत प्रशांत जगताप यांनी देखील एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“बंडखोर आमदार निवडून आले नाही तर शेती करणार, मी शब्द देतो”
दरम्यान, एकीकडे सत्ता होती आणि दुसरीकडे कार्यकर्ता, सैनिक पण तो मात्र बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सैनिक होता. या ५० जणांचा अभिमान वाटतो. त्यांनी कुठे चाललोय, किती दिवस लागतील हे काहीही विचारलं नाही. मतदानाच्या दिवशी मला जी वागणुक मिळाली, त्याचे साक्षीदार हे आमदार आहेत. अन्यायाविरूद्ध न्याय मागण्यासाठी बंड, उठाव काहीही करावं लागतं. हे सांगितलं होतं. यानंतर काय झालं माहित नाही. पण त्यानंतर लोक येत राहिले आणि काय झालंय, कुठे चाललोय काहीही समजलं नाही. मला विचारण्यात आलं कुठे चाललात, माहित नाही, असं मी सांगितलं. जर या बंडखोर आमदारांना भविष्य़ातील निवडणुकीत निवडून आले नाहीतर तर गावाकडे जाऊन शेती करणार असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
Read also
- “तर आम्ही तुमच्या पाया पण पडू”; अजित दादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर निलेश राणेंची प्रतिक्रिया
- त्यामुळेच आदित्य ठाकरेंना अपात्रतेची नोटीस पाठवली नाही; सेनेच्या 14 आमदारांना नोटीस
- “आज सर्वच पक्षातील व अपक्ष आमदार इडी शाहीला टरकलेले आहेत” हरी नरके
- मुख्यमंत्र्यांनी आज केल्या तीन महत्वाच्या घोषणा; तालिका अध्यक्षांची देखील जाहीर केलीत नावे
- “शिंदे साहेबांची बुलेट ट्रेन काही थांबली नाही”; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर फटकेबाजी