मुंबई : विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी शिवसेनेचे मुख्यम प्रतोद भरत गोगावले यांनी व्हिप पाठवला होता. काही आमदारांनी या व्हिपच्या विरोधात मतदान केल्याने 14 आमदारांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र यामध्ये शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचं नाव वगळण्यात आलं आहे.
“बंडखोर आमदार निवडून आले नाही तर शेती करणार, मी शब्द देतो”
बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर करतो. त्यामुळेच आदित्य ठाकरेंना नोटीस बजावण्यात आलेली नाही. असं मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितलं आहे. आदित्य ठाकरेंचं नाव अपात्र ठरवण्यासाठी देण्यात आलेलं नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असलेला आदर हे त्यामागचं कारण असंही गोगावले म्हणाले. भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांना व्हिप बजावला होता. शिंदे गटात असलेल्या 40 आमदारांनी ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. मात्र शिवसेनेच्या 15 आमदारांनी ठरावाच्या विरोधात मत दिलं.
“ज्यांची लोकांमधून निवडून यायची लायकी नाही, ते आम्हाला बोलतात”; गुलाबराव पाटलांचा राऊतांवर घणाघात
राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. हे सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. आपण विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडल तर मध्यावधी निवडणुका लागतील त्यामुळें तयारी आत्तापासून करा. असं राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलं आहे.
अजित पवारांची खुर्ची आता फडणवीसांना अन् फडणवीसांची खुर्ची अजित पवारांना
दरम्यान, विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की आमच्या विजयामध्ये काही अदृश्य शक्तींचा हात होता. त्यावरूनच की काय सभागृहात मतदानाच्या वेळी 10 आमदार गैरहजर होते. यामध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक, लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, दत्तात्रय भरणे, निलेश लंके, अण्णा बनसोडे, बबन शिंदे, आणि प्रणिती शिंदे अनुपस्थित होते.
Read also
- “आज सर्वच पक्षातील व अपक्ष आमदार इडी शाहीला टरकलेले आहेत” हरी नरके
- मुख्यमंत्र्यांनी आज केल्या तीन महत्वाच्या घोषणा; तालिका अध्यक्षांची देखील जाहीर केलीत नावे
- “शिंदे साहेबांची बुलेट ट्रेन काही थांबली नाही”; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर फटकेबाजी
- ..तर मी जगाचा निरोप घेईल; एकनाथ शिंदेंनी दिला शब्द ! वाचा सविस्तर भाषण
- “एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिंमत करणारा अजून पैदा झालेला नाही”