मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यानंतर त्यांनी सभागृहात भाषण केलं. त्यावेळी त्यांनी विधानसभेतील त्यांच्या काळातील विरोधी पक्षनेत्यांच्या आठवणींना उजाळा दिला. नारायण राणेंनी शिवसेनेत असताना विरोधी पक्षनेत्याची भूमिका साकारली होती. त्यांचाही उल्लेख अजित पवारांनी केला. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिंमत करणारा अजून पैदा झालेला नाही”
विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची भूमिका फार महत्वाची असते. ज्यावेळी नारायण राणे शिवसेनेत असताना विरोधी पक्षनेते होते. त्यांचा मोठा दरारा होता. त्यांनी मागे वळून जरी पाहिले तरी सर्व आमदार शांत बसत होते. राणे साहेबांनी तो दरारा निर्माण केला होता. त्यामुळे त्यांची गोष्ट वेगळीच होती. तशा प्रकारचा वातावरण निर्माण झाला पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलं होतं.
“बंडखोर आमदार निवडून आले नाही तर शेती करणार, मी शब्द देतो”
आम्हाला दुसरं काही नको. आमच्या माणसाला मानसन्मान दिलात. तर त्या बदल्यात तुमच्या पाया पण पडू, असं अजित पवारांच्या या वक्तव्यावर निलेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकुन कोणाच्या मनामध्ये शंका राहिली नाही की महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करेल. मुख्यमंत्री कसा असावा हे आज महाराष्ट्राने बघितलं आहे. मागच्या मुख्यमंत्र्यांने अडीच वर्षात फक्त नाक्यावरची भाषणे व टोमणे मारण्यापलीकडे काही केलं नाही. असा टोला देखील निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
“ज्यांची लोकांमधून निवडून यायची लायकी नाही, ते आम्हाला बोलतात”; गुलाबराव पाटलांचा राऊतांवर घणाघात
दरम्यान, अजित पवार पुढे म्हणाले होती की, महाराष्ट्राच्या विधानमंडळाला एक गौरवशाली पंरपरा आहे, सर्वांची नावं घेणार नाही, परंतु विरोधी पक्षाच्या खुर्चीवर अनेक नेत्यांना बसताना पाहिलं आहे. गेल्या काही दिवसात अधिवेशन झाली नाहीत . नागपुरलाही अधिवेशन घेण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विचार करावा. असंही अजित पवार म्हणाले. तसेच त्यांनी मागील काही काळातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांचा देखील उल्लेख याठिकाणी केला.
आम्हाला दुसरं काही नको आमच्या माणसाला मानसन्मान दिलात, बदल्यात तुमच्या पाया पण पडू 🙏🏻 pic.twitter.com/S4igWsDbd6
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 4, 2022
Read also
- त्यामुळेच आदित्य ठाकरेंना अपात्रतेची नोटीस पाठवली नाही; सेनेच्या 14 आमदारांना नोटीस
- “आज सर्वच पक्षातील व अपक्ष आमदार इडी शाहीला टरकलेले आहेत” हरी नरके
- मुख्यमंत्र्यांनी आज केल्या तीन महत्वाच्या घोषणा; तालिका अध्यक्षांची देखील जाहीर केलीत नावे
- “शिंदे साहेबांची बुलेट ट्रेन काही थांबली नाही”; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर फटकेबाजी
- ..तर मी जगाचा निरोप घेईल; एकनाथ शिंदेंनी दिला शब्द ! वाचा सविस्तर भाषण