मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी ब्राम्हण महासंघाचे नेते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचं म्हटलं आहे. त्यासंदर्भात त्यांनी पुणे पोलिसांना त्यांच्या सुरक्षतेची काळजी देखील घेण्यास सांगितले आहे. तर त्यांनी उदयपुरमधील घटनेचा दाखला देखील दिला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज केल्या तीन महत्वाच्या घोषणा; तालिका अध्यक्षांची देखील जाहीर केलीत नावे
संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, ब्राम्हण महासंघाचे नेते, कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणानी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे. उदयपूरप्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.
“शिंदे साहेबांची बुलेट ट्रेन काही थांबली नाही”; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर फटकेबाजी
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, बंडखोर ज्या चार लोकांची नावं घेत आहेत त्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली. ते जे कुणी चार लोक म्हणत आहेत ते सतत पक्षाचंच काम करत होते. आजही पक्षाचंच काम करतात. गेले अडीच वर्षे सत्तेत राहिले, त्याआधीही राहिले, तेव्हाही हे चार लोक ज्यांना तुम्ही आज बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात हे पक्षाचे निष्ठावान आहेत. उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नाहीत, ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात.
..तर मी जगाचा निरोप घेईल; एकनाथ शिंदेंनी दिला शब्द ! वाचा सविस्तर भाषण
दरम्यान, विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी शिवसेनेचे मुख्यम प्रतोद भरत गोगावले यांनी व्हिप पाठवला होता. काही आमदारांनी या व्हिपच्या विरोधात मतदान केल्याने 14 आमदारांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र यामध्ये शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचं नाव वगळण्यात आलं आहे.
ब्राम्हण महासंघाचे नेते,
कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणानी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे..उदयपूर प्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसानी @ANANDDA62133632
आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.@PunePolice4U pic.twitter.com/aG3ONI0guZ— Sanjay Raut (@rautsanjay61) July 5, 2022
Read also
- “लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात”; काॅंग्रेसची जहरी टिका
- “तुमच्या 50 लबाडांना शेती सोसणार नाही, त्यापेक्षा पाटलांसोबत हिमालयात जा”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “तर आम्ही तुमच्या पाया पण पडू”; अजित दादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर निलेश राणेंची प्रतिक्रिया
- त्यामुळेच आदित्य ठाकरेंना अपात्रतेची नोटीस पाठवली नाही; सेनेच्या 14 आमदारांना नोटीस
- “आज सर्वच पक्षातील व अपक्ष आमदार इडी शाहीला टरकलेले आहेत” हरी नरके