मुंबई : देवेंद्र रात्री वेश बदलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला जात होते. यादरम्यान वेगळाचा पोशाख करून, डोळ्यावर मोठा गॉगल लावून ते घराबाहेर पडायचे. मलाही ओळखू येत नव्हते. असा धक्कादायक गौप्यस्फोट अमृता फडणवीस यांनी केला आहे. विधानभवनात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणानंतर अमृता फडणवीस यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
बापरे..! दोन मयत शिवसैनिकाची पदाधिकारी म्हणून निवड
देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी ज्यावेळी बंडखोर आमदार झोपलेले असायचे तेव्हा मध्यरात्री भेटण्यासाठी जात होतो. तर त्यांना उठायच्या आधी मी हॉटेलमध्ये परत येत होतो. असं एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांसमोर म्हटलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी देवेंद्रजी वेश बदलून एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी रात्री जात होते. असं विधान त्यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी आता फुटीच्या उंबरठ्यावर! राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा परिणाम
एकनाथ शिंदे यांचं भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं. त्यावरून असं लक्षात येतं की आमदारांमध्ये किती अनरेस्ट होता. त्यामुळे कुठे ना कुठे तो अनरेस्ट निघणारच होता. मग भाजपने त्याला वाट मोकळी करून देण्याचं काम केलं आणि देवेंद्र त्यांच्यामागे उभे राहिले आहेत, तर ते चांगलंच आहे, असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
बंडखोर आमदाराची आदित्य़ ठाकरेंवर खिल्ली; म्हणाले, “त्यांच्या चष्मातून डोळे दिसतील तर..”;
दरम्यान, विधानभवनात बहुमत चाचणी जिंकल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. त्यामध्ये सत्तासंघर्षाच्या काळात काय काय घडलं ते सर्व एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात सांगितलं. यावेळी बंड कसा केला, यामागे कोण अशी सर्व नावे त्यांनी सांगून टाकली. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी कपाळावर हात मारून घेतलं.
Read also
- “विश्वप्रवक्ते पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांसाठी कोणत्या नवीन शब्दांचा वापर करायचा”; मनसेचा सवाल
- “काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, रिक्षाला ब्रेकच लागत नव्हता”
- “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला”; एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
- “कुणी आम्हाला रिक्षावाले म्हणून हिणवत असेल तर आम्हाला त्याचा आनंद”
- तर मातोश्रीची पुजा करून सर्वच आमदार निवडून आले असते; अपक्ष आमदारांचा टोला