जळगाव : भाजप नेते निलेश राणे यांनी जळगाव जिल्ह्यातील वाळू चोरीच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. या टीकेला आता पाटील यांनी उत्तर दिले आहे.
जळगाव जिल्ह्यातील वाळू चोरीचे हफ्ते मंत्र्यांना जातात असा आरोप करत, निलेश राणे यांन गुलाबराव पाटील यांचा सुपारीचोर असा उल्लेख केला होता. यावर आता पाटील यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.
‘राणेंनी वांद्रे येथे घर बांधले तेव्हा रेती मीच पाठवली होती आणि मी सुपारीचोर आहे तर त्यांच्या वडिलांची हऱ्या-नाऱ्याची गॅंग होती हे त्यांनी आठवावे.’, असे जोरदार प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी निलेश राणेंना दिले.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात जी वाळू चोरी सुरू आहे, ते कलेक्शन गुलाबराव पाटील यांच्यासाठीच सुरू असेल. वाळू चोरीचे हफ्ते स्थानिक आमदार आणि मंत्र्यांना दिले जातात. गुलाबराव हे आधी पानटपरी चालवायचे. तेच ना गुलाबराव. इथे पालकमंत्री आहेत सुपारीचोर, अशी टीका निलेश राणेंनी केली होती. यावर ‘माझा वाळू चोरांशी संबंध असेल तर तो निलेश राणे यांनी सिद्ध करुन दाखवावा.’, असे आव्हान राणेंच्या आरोपांवर पाटील यांनी केले आहे.
Read Also :
- भाजप नेत्यांची बैठक म्हणजे चार तासांचा ‘कुटाणा’, अमोल मिटकरींची टीका
- ‘…म्हणजे मुख्यमंत्री घरी बसायला मोकळे’, भातखळकरांचा खोचक टोला
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली शरद पवारांच्या प्रकृतीबाबत विचारपूस
- ‘अमरावतीची जनता रिटेकची संधी देणार नाही, अभिनयाकडे परत फिरा’
- ‘पंतप्रधानपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?’