नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. राज्यातील मराठा आरक्षणासह विविध 12 मुद्दे यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर मांडले. तसेच, या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे सांगितले जात आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी पवारांच्या प्रकृतीबाबत चौकशी केल्याच्या चर्चा आहे.
पंतप्रधान मोदींनी अजित पवार यांच्याकडे शरद पवारांच्या प्रकृतीबाबत चर्चा केली. शरद पवार साहेबांची तब्येत व्यवस्थित आहे ना? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांना विचारला. यावर अजित पवारांनी देखील तब्येत व्यवस्थित असल्याचे सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वैयक्तिक भेट झाल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. याबाबत प्रश्न विचारला असता, आम्ही राजकीयदृष्ट्या त्यांच्याबरोबर नाहीत, पण त्याचा अर्थ असा नाही की आमचं नातं तुटलं आहे. त्यांना भेटण्यात काहीच गैर नाही. मी काही नवाज शरीफ यांना भेटायला नव्हतो गेलो, असे ते म्हणाले.
Read Also :
- ‘अमरावतीची जनता रिटेकची संधी देणार नाही, अभिनयाकडे परत फिरा’
- ‘पंतप्रधानपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?’
- ‘खासदारकीला कोणताही धोका नाही’, नवनीत राणांना विश्वास
- पुण्यात फॅक्टरीला आग लागून मोठी जिवितहानी, सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी
- मुंबईच्या मधोमध जंगल फुलणार, ‘आरे’ची 286 हेक्टर जागा वनविभागाकडे सुपूर्द