मुंबई : मागील काही दिवसापासून शिवसेना आणि भाजपमध्ये विविध कारणांमुळे चांगलीच जुंपली आहे. दोन्ही बाजूंच्या नेते एकमेकांवर टिका टिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे राज्यातील मागील काही दिवसापासून राजकीय वातावरण चांगलंचं तापलेलं दिसून येत आहे. यातच शिंदे गटाचे लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे यांच्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निशाणा साधला आहे.
अलिकडेच शिंदे गटाचे लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यावरून राहुल शेवाळे तुम्ही निवडून आलात धनुष्यबाणावर आणि उंबरे झिजवता भाजपाई मंडळीचे? कितीही उंबरे झिजवा, यंदा तुम्हाला तुमच्याच मतदारसंघात आम्ही तुम्हाला चितपट करू. गाठ खऱ्या शिवसेनेशी, शिवसैनिकांशी आहे, ध्यानी असू द्या. असा इशारा अंबादास दानवे यांनी राहुल शेवाळे यांना दिला आहे.
कसबा पेठ अन् पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान.! राष्ट्रवादी अन् भाजप
दरम्यान, शिवसेना नेमकी कुणाची ? धनुष्य़बाण नेमका कुणाचा? यावर सर्वोच्च न्यायालय आणि निवडणुक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. यावर अद्यापही कोणताही निर्णय लागलेला दिसून येत नाही. त्यामुळे याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे. यातच आता राहुल शेवाळे यांच्यावर अंबादास दानवे यांनी टिका केलीय.
Read also
- पिंपरी चिंचवड पोटनिवडणुक जगतापांच्याच कुटुबांतील उमेदवार, राष्ट्रीवादीच्या भूमिकेकडे लक्ष्य..
- “आई बहिणींची अब्रु आमच्यासाठी सर्वतोपरी, शिवसेना कायम उभी राहणार”
- “आई बहिणींची अब्रु आमच्यासाठी सर्वतोपरी, शिवसेना कायम उभी राहणार”
- “भाजपची रणनीती माणसं फोडा अन् मत मिळवा, नाशिकमध्येही तेच झालं”
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर.! पुढील सुनावणी ३ आठवड्यांनी