मुंबई : बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांनी आमदार झाल्यानंतर सामनाच्या कार्यालयात येऊन माझ्यासमोर लोटांगण घातले होते. असं शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता संदीपान भुमरे यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना राऊतांनासमोर कोणतेही लोटागणं घातले नसल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी राऊतांना पुन्हा जनतेतून निवडून येऊन दाखवावं असं आव्हान देखील दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दालनात फुलांची सजावट; सत्यनारायणाच्या पुजेनं होणार नव्या सरकारची सुरूवात
ज्या दिवशी आमदाराकीची निवडणुक झाली होती. तेव्हा संदीपान भुमरे यांनी सामानाच्या कार्यालयात येऊन माझ्यासमोर लोटागंण घातले होते. त्यासंदर्भात माझ्याकडे व्हिडीओ देखील आहे. त्याचा पुरावाही मी देऊ शकतो. असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. त्यावर बोलताना भुमरे म्हणाले की, ज्या वेळी सत्ता आली तेव्हा त्यांचं धन्यवाद देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो होतो. मी कधीच कुणासमोर लोटागंण घातलं नाही. निवडणुक जिंकल्यानंतर राऊतांना भेटलो होतो. मात्र लोटांगण घातलं नव्हतं. असं स्पष्टीकरण भुमरे यांनी दिलं आहे.
राज्यातील राजकीय नेत्यांनी टिका केली पाहिजे पण कोणत्या पातळीपर्यंत करायला हवी. हे त्यांना समजायला हवं. आम्हाला तीन ते चार लाख लोक निवडून देतात. त्यांच्यासारखं आम्ही दुसऱ्यांच्या मतावर निवडून आलो नाही. असं असेल तर त्यांनी खासदारीकीचा राजीनामा देऊन जनतेतून निवडून दाखवावं. असं आव्हान देखील राऊतांना आमदार भुमरे यांनी दिले आहे. तसेच ज्यावेळी संजय राठोड यांचं प्रकरण पुढे आलं होतं. त्यावेळी आम्ही त्यांना पडद्यामागून मदत केली होती. असं देखील संजय राऊतांनी म्हटलं आहे.
“भाजप पदाधिकाऱ्यांचं कृत्य देशभरातील ओबीसी आरक्षणासाठी मारक”
दरम्यान, बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 40 बंडखोर आमदारांवर संजय राऊत सातत्याने टिका करताना दिसत आहेत. तर तिकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला आहे. विशेष अधिवेशनात केलेल्या भाषणानंतर रिक्षा वाल्याची रिक्षा सुसाट सुटली. त्याला ब्रेकच लागला नाही. असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. तर रिक्षावाल्याने मर्सडिजला मागे टाकलं आहे. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
Read also
- “चमत्कार बाबा संजय राऊतांमुळेच ठाण्यात एकच नगरसेवक शिल्लक राहिला”
- “भाजप अन् शिवसेनेमध्ये आता लव्ह मॅरेज झालंय”; दिपक केसरकरांंचं वक्तव्य
- भास्करराव जाधवनंतर आता नितेश राणेंही शेतात राबतोय; राणेंनी बांधावरच केली न्याहारी
- उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा जोरचा झटका..! ठाण्यातील तब्बल ६६ नगरसेवक फुटले
- शिवसेनेचे अपमानीत ‘योद्धे’ घायाळ; सामान्य शिवसैनिकांसह नेत्यांमध्ये कमालीची नाराजी