मुंबई – सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाला असला तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर राजन तेली यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तीक कारणांनी हा राजीनामा देत असल्याचं सांगत सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचं तेली यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
पवारांच्या ‘त्या’ एका वाक्यामुळे भाजप-शिवसेनेत अंतर वाढलं, आणि भाजपचा घात झाला.. ते वाक्य कोणतं?
या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलला 11 जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीला 8 जागांवर समाधान मानावं लागलं. दरम्यान, तेली यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं कौतुक करत त्यांना पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याचा सल्ला दिला आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 19 पैकी 19 जागा न मिळाल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार असल्याची घोषणा राजन तेली यांनी केली. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपाचा विजय झाला असला तरी राजन तेली यांचा पराभव झाला आहे. पतसंस्था मतदारसंघातून राजन तेली आणि शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांच्यातील लढतीत नाईक यांनी तेली यांचा पराभव केला.
“नितेश राणेंना कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजाश्रय?”; संजय राऊत यांनी व्यक्त केला संशय
या विजयात राजन तेली यांचीही मोठी मेहनत होती. त्यांचा पराभव झाला असेल. मात्र, त्यांनी खचून जायचं कारण नाही. कारण समोरच्या बाजूला जे प्रत्यक्ष अध्यक्ष होते त्यांचा पराभव झालाय. आम्ही राजन तेली यांना पुन्हा सल्ला देऊ की त्यांनी पुन्हा नव्या दमानं आणि जोमानं कामाला लागलं पाहिजे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय.
Read also:
- ‘शेलारानू.. अर्ध्या हळकुंडानं पिवळं कित्याक व्हतास?’; सचिन सावंत यांनी शेलारांना डिवचलं
- आमच्या कार्यकर्त्याला कोंडीत पकडल्यावर तो ‘म्याव-म्याव’ करत नाही तर ‘डरकाळी’ फोडतो – भाजप
- “..गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…”; आशिष शेलारांचं मालवणीतून ट्विट
- मुंबईत बसून हवेत गोळीबार करू नये; संजय राऊतांचा ठाकरे सरकारला घरचा आहेर
- कोरोनाने पुन्हा एकदा नेत्यांना घेरले आणि तेच ठरतायेत ‘सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना’?