नांदेड : महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेट मधील सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नांदेड मधील बंगल्यावर काही दगड फेकण्यात आल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या सर्व प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. या दगडफेकीत बंगल्याचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे. या दगडफेकीमुळे चव्हाण यांच्या सुरक्षा कक्षाच्या काचेचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत टेन्शन वाढले, वडेट्टीवारांचे थेट अजितदादांना आव्हान
दरम्यान, पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, एक महिला तिच्या एका साथीदारासोबत भांडत रस्त्यावरून जात होती. त्यावेळी, ते एकमेकांवर दगडफेक करत होते. त्यांच्या भांडणात या महिलेने फेकलेला दगड, अशोक चव्हाणांच्या बंगल्याच्या दिशेने आला. त्यातील एक दगड मंत्र्यांच्या बंगल्यावर लागला. त्यामुळे सुरक्षा कक्षाच्या काचेचं नुकसान झालं. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी मोठा फौजफाटा घेत अशोक चव्हाणांच्या बंगल्याकडे धाव घेतली.
प्रितम मुंडे आणि धनंजय मुंडेमध्ये रंगली जुगलबंदी; परळीतील कार्यक्रमात एकमेकांना काढले चिमटे
दुसरीकडे, एकमेकांवर दगडफेक करणाऱ्या त्या महिलेचा आणि तिच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच, हा सगळा प्रकार नैसर्गिकरित्या झाला, की यामागे कुणाचा हात होता? कुणी ठरवून हे कृत्य केले आहे का? याचा आता पोलीस शोध घेत आहेत. या महिलेने फेकलेला दगड बंगल्याच्या सुरक्षा कक्षावर येऊन इतका मोठ्याने आदळला, की त्यामुळे सुरक्षा कक्षाची मोठी काच पूर्णपणे फुटली.
Read Also :
- यात्रा आणि आंदोलन करणाऱ्या भाजप-मनसेला मुख्यमंत्र्यांनी फटकारले, म्हणाले…
- व्यस्त होते तरी परबांनी चौकशीला जायला हवे होते, चंद्रकांत पाटलांचे सूचक भाष्य
- घंटानाद करा, नायतर आणखी कसला नाद करा पण आमचा नाद करु नका – किशोरी पेडणेकर
- ‘हे’ नियम पाळून पुणेकर साजरा करू शकतात गणेशोत्सव; पोलिसांकडून आचारसंहीता जाहीर
- बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत, कामातून आशीर्वाद मिळतात – उद्धव ठाकरे