नागपूर : ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणात, केवळ ‘इन्व्हेस्टिगेशन पार्ट’ इतकेच नमूद केलेली नोटीस मिळाल्यांनतर, परिवहन मंत्री अनिल परब यांना आज चौकशीसाठी सकाळी ११ वाजता कार्यालयात हजर राहावे, असे सांगण्यात आले होते. परंतू अनिल परब यांनी ईडीकडे १४ दिवसांची वेळ मागितली आहे. यासाठी त्यांनी ईडीला पत्र पाठवले असून, त्यात “मंत्री असल्याने काही ठरलेली कामे आहेत, यामुळे हजर राहू शकत नाही,” असे कारण सांगितले आहे.
परिवहन विभागातल्या भ्रष्टाचाराची होणार लोकायुक्तांकडून चौकशी, अनिल परबांना धक्का
या पार्श्वभूमीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला असून, “त्यांनी चौकशीसाठी जायला हवे होते,” असे सूचक d
भाष्य केले आहे. आज नागपुरात आढावा बैठकीसाठी आले असताना त्यांनी प्रसार माध्यांना ही प्रतिक्रिया दिली. “सर्वसामान्यांना लगेच अटक होते. हाच नियम मंत्र्यांनाही लागू होतो. त्यामुळे, त्यांनी व्यग्र असतानाही चौकशीला जायला हवे होते,” असे ते म्हणाले.
ईडीच्या चौकशीला परिवहन मंत्री अनिल परब गैरहजर, ईडीला पत्र पाठवून सांगितले कारण
तसेच, आधी संजय राठोड, मग अनिल देशमुख, आता परब यांचा नंबर आहे. महाविकास आघाडीतील मंत्र्यांची लिस्ट फार मोठी आहे. त्यातील काही जणं सुपात आहेत, काही जात्यात आहेत. यंत्रणांचे कामच कारवाई करण्याचे आहे त्याच त्यांचे एक-एक प्रकरण बाहेर काढतील,” असं सांगत, “महाविकास आघाडीतील एक एक मंत्र्यांवर हळूहळू कारवाई होत असल्याने शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे,” असा टोलाही त्यांनी सेनेला लगावला.
महाविकास आघाडी सरकारची ही ‘घोटाळा इलेव्हन’, किरीट सोमय्यांकडून ११ नावे जाहीर
दरम्यान, परब यांना नोटीस मिळाल्यानंतर परिवहन विभागातील अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावरही सोमवारी ईडीने छापेमारी केली. तसेच, इतर दोन ठिकाणी छापे टाकले आणि चौकशी सुरू केली आहे, तर दुसरीकडे, परिवहन विभागातील कथित वसुली प्रकरणात परब यांना धक्का बसला असून, विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना दिले आहेत.
Read Also :
- घंटानाद करा, नायतर आणखी कसला नाद करा पण आमचा नाद करु नका – किशोरी पेडणेकर
- ‘हे’ नियम पाळून पुणेकर साजरा करू शकतात गणेशोत्सव; पोलिसांकडून आचारसंहीता जाहीर
- बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत, कामातून आशीर्वाद मिळतात – उद्धव ठाकरे
- इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत टेन्शन वाढले, वडेट्टीवारांचे थेट अजितदादांना आव्हान
- प्रितम मुंडे आणि धनंजय मुंडेमध्ये रंगली जुगलबंदी; परळीतील कार्यक्रमात एकमेकांना काढले चिमटे