मुंबई : भाजप खासदार किरीट सोमय्या, सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांची वादग्रस्त प्रकरणे बाहेर काढत असून, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांच्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे एक प्रकरण बाहेर काढत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच, अनिल परब आणि भावना गवळी या दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांशी संबंधित काही मालमत्तांवर ईडीने छापे टाकले आहेत.
भाजप आमदारांचा ५०० कोटींचा घोटाळा, भावना गवळींकडून ईडी चौकशीची मागणी
या पार्श्वभूमीवर, भाजप माजी खासदार किरीट सोमैया यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले असून, यावेळी त्यांनी ठाकरे सरकारची ‘महान इलेव्हन’ अशी यादीच दिली ट्विटर वरून जाहीर केली आहे. यात प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, यशवंत जाधव, यामिनी जाधव, मिलिंद नार्वेकर यांची नावे आहेत.
Thackeray Sarkar ki "MAHAN" Eleven
1. Pratap Sarnaik
2. Anil Deshmukh
3. Anil Parab
4. Bhavna Gavli
5. Mayor Kishori Pednekar
6. Ravindra Waikar
7. Jitendra Awhad
8. Chhagan Bhujbal
9. Yashwant Jadhav BMC
Chairman10. MLA Yamini Jadhav
11. Milind Narvekar
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 30, 2021
“ठाकरे सरकारची घोटाळा इलेव्हन. शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी अनधिकृत बांधकाम केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वसुली कांडाचे ईडीने पुरावे दिले. परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट, परिवहन विभागात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरु, शिवसेना खासदार भावना गवळी यांनी बँकेचे पैसे लाटले, मुंबई महापौर किशोरी पेडणेकरांनी गाळे ढापले, माजी मंत्री रवींद्र वायकर आणि रश्मी ठाकरेंनी मिळून जमीन घोटाळा केला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची एसआरएचा भूखंड प्रकरणी चौकशी सुरु, छगन भुजबळांवर आरोप आहेत. शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी UAEमध्ये पैसे पाठवले तर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगला बांधला आणि पाडला,” असे त्यांनी म्हटले आहे.
ठाकरे सरकारचे आणखी एक वसुली मंत्री अनिल परबांना आता ईडीकडे जाऊन कुठून किती वसुली करण्यात आली….
पैसे कुठे गेले मग ते सचिन वाझे चे रु.100 कोटी दर महिन्याचे असो किवा आरटीओ ट्रान्सफर चे पैसे आणि जो दापोली रिसॉर्ट बांधला तो पैसा कुठून आला त्याचा हिशोब द्यावा लागणार @Dev_Fadnavis pic.twitter.com/QPX3mlWfsl
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 29, 2021
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची टीम लूटमार करत आहे. भावना गवळीच्या टीमने १०० कोटींची लूट नाही, तर माफियागिरी चालवली आहे. त्यांनी १८ कोटी रुपये रोख विविध संस्थांमधून काढले असून, ७ कोटींची चोरी झाल्याचे दाखवले आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेना फक्त एवढेच काम करत आहे. भावना गवळींच्या मालकीच्या विविध संस्थांची चौकशी सुरु आहे. ईडीच्या कारवाईचे स्वागत,” असं ते म्हणाले.
Read Also :
- मनसे आक्रमक, “ठाण्यात अडवले दादरमध्ये हंडी उभारू!”- संदीप देशपांडे
- “एक ना एक दिवस आमचेही दिल्लीत दिवस येतील”, ईडीच्या छापेमारीवरून संजय राऊतांचा इशारा
- ईडीच्या कारवाईनंतर शिवसेनेच्या गोटात घडामोडींना वेग, अनिल परब संजय राऊतांच्या भेटीला
- मोठी बातमी : शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबंधित तीन मालमत्तांवर EDची धाड
- दहीहंडी साजरी करणार! मनसे-पोलीस आमने-सामने, पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात