यवतमाळ : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी अडचणीत सापडल्या आहेत. यवतमाळ-वाशिमच्या खासदार असलेल्या गवळींच्या ५ संस्थांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. मुंबईहून वाशिमला पोहोचलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी गवळींच्या संस्थांवर धाडी टाकल्या आहेत. या प्रकरणी गवळींनी भाष्य करण्यास नकार दिला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांची कारवाई पूर्ण झाल्यावर आपण बोलू, असं त्यांनी सांगितलं आहे. गवळी यांच्या संस्थांवर छापे पडल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे.
शिवसेना खासदार भावना गवळींना मोठा धक्का; ५ संस्थांवर ED ची छापेमारी
मात्र, आता या सगळ्यावर आता भावना गवळी यांनी भाष्य केले असून, “मीही सातत्याने भाजप नेत्यांच्या चौकशीची मागणी केली होती. याठिकाणचे स्थानिक भाजप आमदार भूमाफिया आहेत. त्यांनी ५०० कोटींचा घोटाळा केला आहे,” असा खळबळजनक आरोप करत, “मग केंद्र सरकार माझ्या मागे जशी ईडी लावतंय, तशी त्यांच्यामागे ईडी लावणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, “भाजपने जुलमी सत्र सुरु केलं आहे आणि शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.
ईडीच्या कारवाईनंतर शिवसेनेच्या गोटात घडामोडींना वेग, अनिल परब संजय राऊतांच्या भेटीला
तसेच, “राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. या सगळ्यात आम्ही आणि शिवसेना पक्षप्रमुख शांत आहोत, पण आम्ही लढणार आहोत. मला ईडीची कोणतीही नोटिस आलेली नाही. माझ्या संस्थेवर काही अधिकारी आले आहेत. ते काही चौकशी करत आहेत,” असं सांगत, “सगळ्या प्रकारच्या चौकशीला सामोरे जायला मी तयार आहे. पण भाजप नेत्यांच्या मागेही ईडी लावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
मोठी बातमी : शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबंधित तीन मालमत्तांवर EDची धाड
“मला हिशोब मिळाला नाही, म्हणून माझ्या संस्थेचा एफआयआर मी स्वत: दाखल केला होता. पण, त्यातला एकच आकडा घ्यायचा, तो ट्विट करायचा आणि राईचा पर्वत करायचा खेळ काही नेत्यांनी मांडला आहे. माझ्या संस्थेत, गेल्या २० वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात अनेक गरिब मुले आहेत. गेले ५ टर्म मी खासदार म्हणून कार्यरत आहे. पण काही लोकांना ते पाहावलं गेलं नसावं, म्हणून माझ्या संस्थेवर छापेमारी होत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
Read Also :
- मनसे आक्रमक, “ठाण्यात अडवले दादरमध्ये हंडी उभारू!”- संदीप देशपांडे
- “एक ना एक दिवस आमचेही दिल्लीत दिवस येतील”, ईडीच्या छापेमारीवरून संजय राऊतांचा इशारा
- “महाविकास आघाडी सरकारला फक्त नोटांचा आवाज ऐकू येतो”, चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
- दहीहंडी साजरी करणार! मनसे-पोलीस आमने-सामने, पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
- “राणे आजही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत, हि विकृती कधीही आहे, जाणार नाही”