मुंबई : आधी ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणात नोटीस मिळाल्यांनतर, परिवहन मंत्री अनिल परब यांना आज चौकशीसाठी हजर राहायचं आहे. तसेच, त्यांच्याशी संबंधित तीन ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी केली गेली आहे. यातच आता परिवहन विभागातील कथित वसुली प्रकरणात परब यांना धक्का बसला असून, विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना दिले आहेत.
“यांची बाहेर जायला फाटते, त्यात आमचा काय दोष?” निर्बंधांवरून राज ठाकरेंची जळजळीत टीका
यासंबंधीची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली होती. “आता चौकशी सुरु होत आहे. परिवहन विभागातील अधिकारी बजरंग खरमाटे हा अनिल परबांचा सचिन वाझे आहे. ईडीने काल त्याच्या वास्तूंवर धाडी टाकल्या,” असं म्हणत, “अनिल परब यांची संपत्तीही आपण पाहात आहात, हा सगळा पैसा कुठून आणला?” असा सवाल त्यांनी केला आहे. त्यानुसार आता २ सप्टेंबरपासून ही चौकशी सुरु होणार आहे.
श्री. बजरंग खरमाटे, RTO श्री. अनिल परब, परिवहन मंत्री यांच्या संगनमताने अधिकाज्यांच्या बदल्या…. प्रकरणी केलेल्या भ्रष्टाचाराविरुध्द किरीट सोमैया यांची तक्रार
मा.राज्यपाल यांचे आदेशानुसार मा. लोकायुक्त यांनी सुरु केलेली चौकशी/सुनावणी
दिनांक 2/9/2021 रोजी दुपारी 12 वाजता pic.twitter.com/pcUW680PWL
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 31, 2021
महाविकास आघाडी सरकारची ही ‘घोटाळा इलेव्हन’, किरीट सोमय्यांकडून ११ नावे जाहीर
दरम्यान, परिवहन खात्यात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधातली पहिली तक्रार गजेंद्र पाटील यांनी केली होती. त्यात खरमाटे यांचंही नाव होतं. त्यांनी मे च्या महिन्यात तक्रार दाखल केली होती. यात, “परिवहन विभागात बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत आहेत,” असा आरोप त्यांनी केला होता. यासंबंधीतील तक्रार त्यांनी नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात दिली होती. तसेच, न्यायालयात धाव घेत याचिकाही दाखल केली होती. त्यामुळे, आता परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसत आहे.
Read Also :
- हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
- मनसेने विविध ठिकाणी निर्बंधाची हंडी फोडून, नोंदवला ठाकरे सरकारचा निषेध
- ठाणे महापालिका अधिकाऱ्यावर अनधिकृत फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला; मनसे आक्रमक
- मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार; वाचा महापालिका प्रशासनाची नवी नियमावली…
- एसटी कर्मचाऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस सरसावले, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली विनंती