पुणे : गेल्या आठ दिवसांपासून वार्डातील पाणीपुरवठा सुरळीत नाही. भापच्या नगरसेवकांच्या वार्डात पाणी येते मात्र आमच्याच वार्डात का येत नाही, तात्काळ पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुरळीत करा, अन्यथा परिणाम गंभीर होतील, असा आक्रमक पवित्रा आज पु्ण्यातील पाणीप्रश्नावरून शिवसेनेने घेतला. पुणे महापालिकेच्या स्थायी समिती दालनात शिवसेना नगरसेवक विशाल धनावडे यांच्या नेतृत्वात पाण्याची मडका घेवून आंदोलन करण्यात आले. उद्यापर्यंत सुरळीत नाही झाला तर संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेली आठ दिवस विरोधी पक्ष नरगसेवकांच्या प्रभागातील पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. पाण्याच्या टाकीत पाणी आहे. वीज आहे, मात्र पाणी पुरवठा का सुरळीत होत नाही?, असा प्रश्न यावेळी नगसेवक विशाल धनावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला. ते म्हणाले, पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने कालच महापालिका आयुक्तांना तोंडी निवेदन दिले होते. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही. त्यांमुळे आज आम्ही स्थायी समितीच्या दालनात आंदोलन करत आहोत. जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. तोपर्यंत अधिकाऱ्याला खुर्चीवर बसू देणार नाही.
भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; गणेश बीडकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – शिवसेना आक्रमक
अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागतात. काय प्रॉब्लेम आहे ते अधिकाऱ्यांनी सांगावे, काहीच प्रॉब्लेम नसताना पाणी पुरवठा का सुरळीत होत नाही. संबंधित अधिकारी निट काम करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा बदली करा, अशी रोखठोक भूमिका मांडत उद्यापर्यंत पाणी पुरवठा सुरळीत नाही झाला तर संबंधित अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासणार, असा इशारा नगरसेवक धनावडे यांनी दिला.
Read Also :
- नितीन गडकरी यांचा मास्टर स्ट्रोक; नागपूर पालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन हजार कोटी रुपायांच्या कामाचे भुमिपूजन
- पेगासस फोन टॅपिंग प्रकरणी: मोदी-शहांवर विश्वास नाही, मित्र पक्षातील बड्या नेंत्याची चौकशीची मागणी
- मुंबई विमानतळावर राडा करणाऱ्या शिवसैनिकांचे राऊतांकडून समर्थन
- आमचा सीएम जगात भारी, सर्वांच्या पाठीवर “शिव पंख” लावून द्या, कामावर जाता येईल – मनसे
- लोकसेवा आयोगाच्या रिक्त पदे भरण्यासाठी आघाडी सरकारला एखाद्या ‘वाझे’ ची प्रतीक्षा आहे का?, भाजपचा खोचक सवाल