मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा गेला तीन आठवड्यांपासून बेमुदत संप सुरु आहे. एसटीचे विलगीकरण आणि पगारवाढ या दोन मुद्द्यांवर एसटीचे कर्मचारी आझाद मैदानात आणि प्रत्येक जिल्ह्यातील डेपोंमध्ये ठाण मांडून बसले आहेत. आता सरकारनेही दोन पाऊले पुढे येत कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा घोषणा केली आहे आणि कर्मचाऱ्यांनी संप मिटवण्याची भूमिका घ्यावी असं देखील म्हटलं आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची धास्ती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली तातडीची बैठक
संपला थेट पाठींबा देणारे भारतीय जनता नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर हे संपातून बाहेर पडले आहेत. कर्मचाऱ्यांनी देखील आता सरकारने दिलेल्या पगारवाढीच्या निर्णयावर थोडा विचार करावा असं त्यांनी जाता जाता सांगितलं होतं.
मार्च एप्रिलमध्ये भाजप-शिवसेनेचे राज्यात सरकार स्थापन होईल – रामदास आठवले
सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची गेल्या तीन दिवसांपासून चातकाप्रमाणे वाट बघितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. आता सरकारची प्रतीक्षा देखील संपली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितल्याप्रमाणे आजपासून जे एसटीचे कर्मचारी कामावर हजर राहणार नाहीत त्यांच्या सेवासमाप्तीचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. सरकारने दिलेल्या अल्टिमेटम नुसार आज पासून गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
भाजपला मोठं खिंडार; भाजपमध्ये गेलेल्यांची लवकरचं घरवापसी होणार…
आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी माघार घेतल्यापासून जवळपास १८०९० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. ७० हजार कर्मचारी अजूनही संपात ठाण मांडून बसले आहेत. जर आता कर्मचारी कामावर परतले नाहीत तर सरकारला नाईलाजास्तव कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी लागेल. मिळालेल्या माहितीनुसार काळ शनिवारी संध्याकाळ पर्यंत राज्यभरात ९३७ बसेस धावल्या आहेत. काही ठिकाणी बसवर दगडफेक देखील करण्यात आली आहे. बसमधून १३,००७ प्रवाशांनी प्रवास केला आहे. यात ४९ शिवनेरी, १५८ शिवशाही, ९ हिरकणी आणि ७२९ साध्या बसचा समावेश आहे.
Read Also :
- ‘रेकॉर्ड ब्रेक’ उपक्रम : ‘रिव्हर सायक्लोथॉन’द्वारे इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती
- राज्यात पुन्हा निर्बंध लागू, सरकारची नवी नियमावली जाहीर… वाचा सविस्तर…
- ‘त्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते ते बोलले’; अजित पवारांचा नारायण राणेंना टोला
- नवाब मलिक यांना आपल्या कृत्यांची जाणीव झाली असेल; प्रविण दरेकरांचा टोला
- एसटी आंदोलन पेटले; शेवगाव आगाराच्या 3 एसटी बसेसवर दगडफेक, बसचालक जखमी