नवी दिल्ली : यावर्षी प्रजासत्ताक दिनाची परेड रद्द करावी, अशी मागणी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून परेड रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ब्रिटनमध्ये नव्या कोरोना व्हायरसने थैमान घातला असून, तेथे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनी पाहुणे म्हणून येणारे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देखील त्यांची भेट रद्द करावी, असे आवाहन स्वामी यांनी केले आहे.
Again I urge PM Modi to cancel Republic Day parade on January 26th as well as request UK PM Boris Johnson to postpone his visit to his relief.
— Subramanian Swamy (@Swamy39) January 5, 2021
सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत मागणी केली की, मी पुन्हा पंतप्रधानांना 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची परेड रद्द करण्याची विनंती करतो. तसेच, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांची भेट स्थगित करावी, अशी विनंती स्वामी यांनी केली आहे.
Reading media report that 150 Army jawans contracted Coronavirus while in Delhi for rehearsal for Republic Day open Parade, and other such incident too tragic to report, I urge PM to cancel the Parade this year. It will be relief for UK PM too not leave London in midst of Brexit
— Subramanian Swamy (@Swamy39) January 2, 2021
याआधी देखील स्वामी यांनी ट्विट करत परेड रद्द करण्याची मागणी केली होती. प्रजासत्ताक दिनाची रंगीत तालीम करताना दिल्लीत 150 जवांनाना कोरोनाची लागण झाली असल्याचे त्यांनी म्हटले होते.
दरम्यान, दुसरीकडे शेतकरी संघटनांनी मोदी सरकारने ३ शेती कायदे रद्द न केल्यास व किमान हमी भावाचा नवा कायदा न आणल्यास येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर परेड काढण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
Read Also :
- … अन् शेतकऱ्यांनी भाजप नेत्याच्या घरासमोर टाकले शेण
- नव्या कोरोना व्हायरसचे थैमान, ‘या’ देशाने पुन्हा केली लॉकडाऊनची घोषणा
- उद्या कदाचित मलाही ईडीची नोटीस येऊ शकते – रोहित पवार
- ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’, पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सेनेचे गुजराती कार्ड
- महाराष्ट्रात आढळले नव्या कोरोना स्ट्रेनचे रुग्ण, मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली ‘ही’ मागणी
- शेतकरी – सरकारमधील चर्चा पुन्हा निष्फळ, 8 जानेवारीला पुढची बैठक
- आदर्श गाव ‘हिवरे बाजारात’ तब्बल 30 वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक