पुणे : काल महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे, बारामतीमधून सुप्रिया सुळे तर पुण्यातून रवींद्र धंगेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी शरद पवारांनी विरोधकांवर सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला.सत्तेचा उन्माद काय असतो ह राज्यकर्त्यांनी दाखवून दिलं असं म्हणत शरद पवारांनी राज्य सरकारवरही चांगलीच टिका केली. तर राम मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही ? असा सवाल देखील पवारांनी केलाय. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केलाय.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राम मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही? असा जावई शोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात. शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत पण पवारांना फक्त राजकारण करण्यात रस आहे. तर सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या अप्रत्यक्ष टिकेवरही बावनकुळेंनी भाष्य केलंय. बरं जे शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना आज सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच म्हणावा लागेल. असा टोलाही बावनकुळेंनी लगावला आहे.
दरम्यान, आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी गेली दहा वर्षे या देशातील जनतेची फसवणूक केली. महागाई असो, बेकारी असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, महिलांवरील अत्याचार असो, अनेक गोष्टी आणि यासंदर्भात दिलेली आश्वासने आणि वस्तुस्थिती यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. साधी गोष्ट आहे, पेट्रोलच्या किंमती. मोदी साहेब २०१४ ला सत्तेवर आले. त्यावेळेला डॉ. मनमोहन सिंग किंवा मी किंवा आमच्या सहकाऱ्यांनी देशाची सत्ता सोडली. त्यावेळेला पेट्रोलचे भाव ७१ रुपये लिटर होते. मोदींनी आश्वासन दिलं, ५० दिवसांमध्ये मी पेट्रोलच्या किंमती कमी करतो. हे आश्वासन २०१४ मध्ये दिलं होतं. आज ३ हजार ६५० दिवस झाले. ५० टक्के दर कमी होतो, त्यावेळेला अर्थातच १०६ रुपये लिटर झाला. पहिले आश्वासन ७१ च्या ५० टक्के आणि वस्तुस्थिती १०६ रुपये लिटर आजचा भाव आहे. असंही शरद पवारांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…लोकशाहीच्या महापर्वाला आजपासून सुरूवात, राज्यात पाच मतदारसंघात आज मतदान
हेही वाचा…मोहोळांच्या प्रचारात मनसे सक्रीय ; भाजपा मनसे पदाधिकाऱ्यांची प्रचार नियोजन बैठक संपन्न
हेही वाचा…“मशीनमध्ये कचाकच बटन दाबा’, विरोधकांची टिका, अजितदादांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचा…“बारामतीला लीड मिळणार की नाही, ते बारामतीकर सांगतील”, अजितदादांनी लोकसभेसाठी ठोकला शड्डू
हेही वाचा..” ही माझी शेवटची निवडणूक आहे”, मतदारांना आढळरावांनी घातली भावनिक साद