म्हसाळा : निसर्ग चक्रीवादळात तात्काळ मदत केली म्हणून राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचे खासदार सुनील तटकरे यांनी आभार मानले त्याचबरोबर विद्युत विभागाने मोठ्या परिश्रमाने वादळात खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत केला त्याबद्दल विद्युत विभागाचे सुद्धा आभार मानले.तसेच तटकरे यांनी राज्यातील भाजपचा यावेळी चांगलाच समाचार घेतला आहे. म्हसाळा येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तटकरे बोलत होते.
गुजरातला गरबा खेळायची परवानगी नसताना महाराष्ट्रात गरबा खेळायची मागणी कशाला करता असा सवाल करीत खासदार सुनिल तटकरे यांनी भाजप वर निशाणा साधला. सध्या राज्य कोरोना महामारीशी लढा देत असताना राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेऊन कोणता खेळ खेळत आहेत, असा सवालही त्यांनी केला.
कोरोनाचे संकट असतानाही महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे याचे पोटशूळ विरोधी बाकांवर बसलेल्यांना येत असून नेहमीच राज्य सरकारला डिवचण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे असेही खासदार तटकरे म्हणाले.
मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे छातीठोकपणे सांगणारे आणि पवार साहेबांचा पक्ष राहणार नाही असे भाकित करणारे आता कुठे आहेत हे राज्यातील जनता पाहत आहे. महाविकास आघाडीची मोट बांधत पवार साहेबांनी साऱ्या देशाला थक्क करीत महाराष्ट्रातील जनतेला एक प्रकारे सुखद धक्का दिला आहे.
नुकताच केंद्र सरकारने जाहीर केलेला कामगार कायदा व कृषी विधेयक घातक असून राज्यात बेरोजगारी वाढेल व शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच शेतकऱ्यांच्या सोबत राहिली आहे आणि भविष्यातही शेतकर्यांच्या हिताचेच निर्णय घेणार असे खासदार तटकरे यांनी सांगितले.
म्हसळा तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्नांसंदर्भात व ग्रामीण रुग्णालयातील सोयी सुविधांच्या बाबतीत तालुक्यातील पत्रकारांनी माझी भेट घेऊन प्रश्न मांडले असता मी राज्याचे आरोग्य मंत्री यांच्यासोबत चर्चा केली असून काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे तालुक्यातील पत्रकारमित्र आणि संबंधित अधिकारी यांच्यासमवेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत काही समस्यांवर समाधानकारक तोडगा काढण्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली.
Read Also
नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस तत्पर: गृहमंत्री https://t.co/cQiEr4sGCr @AnilDeshmukhNCP @InfoGadchiroli
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 19, 2020