मुंबई : कोरोनाचे नियम न जुमानता राज्यभरात मोठ्या गर्दीत राजकीय यात्रा आणि सभांना परवानगी आहे, हॉटेल्स मॉल सुरु झाली, मात्र मंदिरात जाण्यासाठीच भाविकांना का रोखले जाते. फक्त मंदिरं खुली केल्यानेच कोरोना वाढतो, का असा सवाल करत भारतीय जनता पक्षाने आज राज्यभरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात हे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. नाशिक, नागपूर, पंढरपूर, पुणे आणि औरंगाबाद, शिर्दी परिसरातील विविध स्थानिक भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध मंदिर परिसरात घंटानाद आणि शंखनाद करत भाजपने मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे.
ओबीसी बैठकीला ‘वांझोटी बैठक’ म्हणणाऱ्यांना विजय वडेट्टीवारांनी सुनावले
महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांचे केंद्रस्थान मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्येही ही निदर्शनं झाली. भाजप अध्यात्मिक आघाडीच्या वतीने रामकुंड परिसरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी साधू महंत आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. नाशिकमध्ये आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी महापौरांचीही उपस्थिती होती. सरकारला टल्ली झालेले लोक चालतात, मग देवाच्या भक्तीत तल्लीन झालेले लोक चालत नाही, असा सवाल नाशिकमधील साधू-महंतांनी केला.
“त्या एका व्यक्तीमुळे भाजप-शिवसेनेचं २५ वर्षाचं नातं बिघडलं,” संजय राऊतांकडून नाव जाहीर
पुण्यातील भाजप आघाडीच्या वतीनंही भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात घोषणाबाजी करत आंदोलन केले. पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीच्या मंदिरात हे आंदोलन करण्यात आलं. हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की, अशी घोषणा देत आज जन्माष्टमीचा मुहूर्त साधत मंदिरं उघडण्यासाठी जोरदार मागणी केली. लोकभावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मंदिरं उघडावीत, अशी मागणी केली.
संजय राऊतांवर चंद्रकांत पाटलांचा जोरदार प्रहार, अनिल परबांनाही दिला इशारा
औरंगाादमध्येही शहर भाजप आघाडीच्या वतीनं शहरातील मध्यवर्ती भागातील गजानन मंदिर परिसरात शंखनाद आणि घंटानाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.
Read Also :
- मोठी बातमी : शिवसेना मंत्री अनिल परब यांना ED ची नोटीस, ठाकरे सरकारला मोठा धक्का
- अनिल देशमुखांना क्लीनचीट मिळालेली नाही, चौकशी सुरुच आहे; सीबीआय’चा मोठा खुलासा
- तब्बल 20 वर्षानंतर गुलाबराव पाटील एकनाथ खडसेंच्या घरी गेले; काय होत नेमकं कारण? वाचा सविस्तर…
- जन आशीर्वाद यात्रेतून भाजप कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहे – अजित पवार
- दरोडेखोर परमवीर सिंग यांना तात्काळ अटक करणं गरजेचं आहे; हसन मुश्रीफांचा आक्रमक पवित्रा