नाशिक : शिवसेना खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नारायण राणेंना छेडले असून, भाजपवर देखील त्यांनी टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना-भाजप संबंधावर बोलताना त्यांनी, भाजप आणि आमचं नातं २५ वर्षांपासूनचं आहे. मात्र ते नारायण राणे या एकाच व्यक्तीमुळे बिघडलं,” असा दावा केला आहे. त्यामुळे, सेना-भाजपत दुरावा निर्माण करण्याला राणे कारणीभूत असल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितल्याने आता भाजप यावर काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
“एकमेकांच्या कार्यालयावर हल्ला करणे आम्हालाही आवडत नाही. राणे जे बोलतात ते फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार बोलू शकत नाहीत म्हणूनच त्यांनी राणेंना शिवसेनेवर बोलायला पुढे केलं,” असा आरोप देखील त्यांनी केला आहे. “आम्ही २५ वर्षे एकत्र राहिलो आणि आता अचानक एका व्यक्तीमुळे नातच तुटून जातं, एकमेकाचे वैरी झालो असं वातावरण तयार झालं आहे,” असं ते म्हणाले.
ओबीसी बैठकीला ‘वांझोटी बैठक’ म्हणणाऱ्यांना विजय वडेट्टीवारांनी सुनावले
दरम्यान, याच दौऱ्यावर असताना त्यांनी, “एक अतिशहाणा निघाला. याची यात्रा नव्हे, येड्यांची जत्रा सुरू आहे. त्यांनी पंतप्रधानांचा आदेश पाळला नाही. या अतिशहाणाल्याला कायद्याचा लगाम घालणं गरजेचं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी तो लगाम घातला,” असा जोरदार हल्लाबोल राणेंवर केला. “त्यांच्यामुळे भाजप रोज १० फूट मागे जातोय आणि लवकरच तो अर्ध्याफूटावर येईल”, असा टोलाही त्यांनी लगावला.
नाव राणे आणि चर्चा करतात फक्त चार आण्याची; अब्दुल सत्तारांची सणसणीत चपराक
तसेच, नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी, “फार बोलणार नाही, पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे. पण अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून टाकू. आपल्याला कार्यक्रम करण्याची सवय आहे. कार्यक्रम केल्यावर परिणामांची चर्चा आणि पर्वा करत कधीही करत नाही,” असं म्हणत, “मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी यांच्यात काल बंद दरवाजा आड चर्चा झाली. ती काय झाली हे सगळ्यांना माहिती आहे,” असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.
Read Also :
- “…याचा अर्थ त्या कारवाया सूडभावनेने”, नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल
- उन्होंने हवा कर दी सर! नारायण राणेंना केंद्रातील बड्या नेत्याचा फोन, संवाद झाला व्हायरल
- “अजून एखादा ‘करेक्ट’ कार्यक्रम करून टाकू”, संजय राऊतांचा सूचक इशारा
- तहसीलदार देवरे प्रकरणाला राजकीय गालबोट; चित्रा वाघ सुपारी घेवून काम करतात?
- मुख्यमंत्री-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंची भाष्य, काढली राजकीय फुग्यातील हवा