मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या तब्ब्ल पावणेसहा कोटी रुपयांच्या संपत्तीवर ईडीकडून टाच आणली गेली. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, “सर्वोच्च न्यायालयाने ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवरून शंका व्यक्त केली आहे. कोर्टाच्या मनात ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत शंका निर्माण होत असेल, तर याचाच अर्थ त्या कारवाया राजकीय लोकांवर सूडभावनेने होत आहेत, हे सत्य आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंची भाष्य, काढली राजकीय फुग्यातील हवा
“ईडी, सीबीआयचा देशातील अनेक प्रकरणांचा तपास ज्या पध्दतीने सुरू आहे, त्यावरच सर्वोच्च न्यायालायने एकप्रकारे शंका निर्माण केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही केंद्रीय तपास यंत्रणांना, त्यांच्याकडे राजकीय व इतर किती केसेस प्रलंबित आहेत, त्याचे प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले होते. मात्र त्यांनी याद्या देऊन त्यांचं काम पूर्ण झालं आहे, अशी भूमिका घेतली. याचाच अर्थ ईडी, सीबीआयच्या कारवाईवर शंका उपस्थित होत आहे,” असं त्यांनी सांगितलं.
“अजून एखादा ‘करेक्ट’ कार्यक्रम करून टाकू”, संजय राऊतांचा सूचक इशारा
यावेळी, “राज्य सरकार गुंड व पोलिसांच्या जीवावर चालते”, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना, “निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केलेल्या राजकीय लोकांमध्ये सर्वाधिक केसेस असणारे नेते भाजपचे आहेत,” असा पलटवार त्यांनी केला. तसेच, “खडसेंच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली, तर काहींना सारखं बोलावून त्रास दिला जात आहे. अशाप्रकारे राजकीय दबावाने काम सुरू आहे,” असा आरोपही त्यांनी केला आहे.
“राणेंची यात्रा ‘जन आशीर्वाद’ नाही, ती तर…”, संजय राऊतांनी पुन्हा एकदा डिवचले
तसेच, “पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ज्या पध्दतीने गुजरातेत सरकार चालवत होते. त्यात पुरुषोत्तम सोलंकी नावाचा दाऊदचा हस्तक होता. त्याला थेट मंत्री मंडळात स्थान दिले गेले होते. अशा मव्य्क्तीला मंत्री केले गेले होते, ज्याच्यावर टाडा लावला होता आणि आजही पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमध्ये असे लोक आहेत. भाजप प्रशासित राज्यात देखील ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत असे लोक आहेत,” असा दावा त्यांनी केला आहे.
Read Also :
- तहसीलदार देवरे प्रकरणाला राजकीय गालबोट; चित्रा वाघ सुपारी घेवून काम करतात?
- उन्होंने हवा कर दी सर! नारायण राणेंना केंद्रातील बड्या नेत्याचा फोन, संवाद झाला व्हायरल
- मोठी बातमी : मुंबई, कोल्हापूर, पुण्यासह राज्यातल्या अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलणार?
- एकनाथ खडसे यांच्यावरील होणारी ED ची कार्यवाही राष्ट्रवादीच्या फायद्याची; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट
- नाशकात राजकीय भूकंपाची शक्यता; संजय राऊतांनी भाजपचा माजी उपमहापौर फोडला?