मुंबई : दसऱ्याच्या दिवशी राज्यात राजकीय भाषणांचा पाऊस पडणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडावर होणार आहे. तर मुंबईत शिंदे आणि ठाकरे गटाचा स्वतंत्र दसरा मेळावा होणार आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवतीर्थ मैदानावर होणार असून त्याचा टिझर देखील जारी करण्यात आला आहे. या टिझरमधून दैवत आपलं ठाकरे हे नवीन गाणं देखील लॉंच करण्यात आलं आहे.
हेही वाचा…विवस्त्र महिलेचा धावतांना व्हिडीओ व्हायरल, भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल
शिवतीर्थ मैदानासाठी शिंदे आणि ठाकरे गटामध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली होती. मात्र यामध्ये ठाकरेचा विजय होऊन महापालिकेने ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी मैदानाची परवानगी दिली. यातच आता दसऱ्याच्या मेळाव्याचा ठाकरे गटाकडून टिझर जारी करण्यात आला असून त्यातून शिंदे गटाला डिवचण्यात आलंय.
हेही वाचा…नेत्यांना मराठा समाजाकडून गावबंदी, शिंदेंच्या ‘या’ मंत्र्यांना गावकऱ्यांनी अक्षर:श पळवून लावलं
दरम्यान, ‘ठाकरे’ ह्या नावाची ताकदच अशी आहे की ते नाव पाठीशी असल्यावर जगातल्या कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायची शक्ती निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनगटात येते. कधीही न आटणारा उर्जेचा आणि मायेचा स्रोत म्हणजेच तमाम निष्ठावान शिवसैनिकांचं दैवत ‘ठाकरे’! ह्याच दैवतावरच्या प्रेमापोटी शिवसैनिकांनी अर्पण केलेलं हे नवीन गीत… ‘दैवत आपलं ठाकरे’! असं ट्विट ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे.
‘ठाकरे’ ह्या नावाची ताकदच अशी आहे की ते नाव पाठीशी असल्यावर जगातल्या कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायची शक्ती निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनगटात येते. कधीही न आटणारा उर्जेचा आणि मायेचा स्रोत म्हणजेच तमाम निष्ठावान शिवसैनिकांचं दैवत ‘ठाकरे’! ह्याच दैवतावरच्या प्रेमापोटी शिवसैनिकांनी… pic.twitter.com/K1tVCp4pmm
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 23, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“काम कमी आणि घोषणा जास्त..! हीच महायुती सरकारची काम करण्याची पद्धत”
हेही वाचा…जमीन हडपण्याच्या वादातून महिलेला केलं विवस्त्र, भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल, महिला आयोग कारवाई करणार?
हेही वाचा…“महाराष्ट्राचे गृहमंत्रालय झोपले आहे का ?” गुजरातच्या पोलिसांनी संभाजीनगरात ५०० कोटींचा ड्रग्जसाठा केला जप्त
हेही वाचा…फडणवीसांकडून दादांच्या खात्यावर अंकुश, अजित पवार गटाकडून १८२७.६५ कोटींचा दिला हिशोब
हेही वाचा…मोठी बातमी..! खोके सरकारची थंडी बिअर योजना! बिअरची विक्री वाढविण्यासाठी सरकारने स्थापन केली समिती