छत्रपती संभाजीनगर : राज्यात मागील काही दिवसापासून ड्रग्ज प्रकरण गाजत असतानाच आता छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसांनी छापेमारी करत २५० कोटींचा ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी याआधी नाशिक आणि पुण्यात धाडी टाकल्या आहेत. हे प्रकरण जिवंत असतांना पैठण एमआयडीसीमध्ये पोलिसांनी छापेमारी करत तीन प्रकारचा ड्रग्जसाठी जप्त केला असून याप्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा…शाब्दिक फसवाफसवी करून सरकार आंदोलकांच्या भावनांशी खेळतंय का ? २४ तासात जाहिरातीची भाषा बदलली
गुजरातमधील ड्रग्जशी संबंधित एका गुन्हाचा तपा करत असताना संभीजनगर येथे अंमली पदार्थांचे उप्तादन करणारा कारखाना असल्याची माहिती डीआरआयच्या पथकाला मिळाली होती. त्याचा शोध घेण्यासाठी अहमदाबादमधील डीआरआयचे पथक, अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक, आणि पुण्यातील डीआरआयचे पथक २० ऑक्टोंबर पासून संभाजीनगर शहरात दाखल होते.
त्यांनी शोधमोहिम सुरू केली असता पैठण एमआयडीसीमधील महालक्ष्मी इंडस्ट्रीज हा कारखाना मेफेड्रॉन आणि केटामाईन या अंमली पदार्थांच्या उत्पादनात गुंतलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने ४.५ किलो मेफेकॉन, ४.३ किलो केटामाईन आणि सुमारे ९.३ किलो वजनाचे मेफेड्रानचे आणखी एक मिश्रण असलेला साठा पोलिसांनी जप्त केला.
हेही वाचा…शिंदे गटाचा दसरा मेळावा अडचणीत..!शिंदेंना रावण दहनाचा कार्यक्रम तिथीनुसार का नकोय? मंत्र्यांकडून मंडळांवर दबाव
या प्रकरणात संदीप शंकर कुमावर आणि जितेशकुमार हिनोरिय प्रेमजीभाई या दोघांना अटक केली आहे. तर अटकेनंतर संदीप कुमावतला पैठण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यासमोर हजर केले असता त्याला २३ ऑक्टोंबर पर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे.
हेही वाचा…तेलंगणाच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या ‘या’ दोन नेत्यांचा कस लागणार ? पक्षानी सोपवली मोठी जबाबदारी
दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्रालय झोपले आहे का ? गुजरात राज्याचे गुन्हे शाखेचे पोलिस देतात की संभाजीनगरात कुठे काय आहे! बाहेरच्या टीम संभाजीनगर येथे येऊन तब्बल ५०० कोटींचे ड्रग्ज अणि त्यासंबंधीचे साहित्य जप्त करतात. एवढा मोठा व्यवसाय येथे राजरोस सुरू असतो आणि इथे थांगपत्ता नाही, असे कसे होईल! यात गृह खातेच सहभागी आहे का, असा सवाल राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्रालय झोपले आहे का ? गुजरात राज्याचे गुन्हे शाखेचे पोलिस देतात की संभाजीनगरात कुठे काय आहे! बाहेरच्या टीम संभाजीनगर येथे येऊन तब्बल ५०० कोटींचे ड्रग्ज अणि त्यासंबंधीचे साहित्य जप्त करतात. एवढा मोठा व्यवसाय येथे राजरोस सुरू असतो आणि इथे थांगपत्ता नाही, असे कसे…
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…फडणवीसांकडून दादांच्या खात्यावर अंकुश, अजित पवार गटाकडून १८२७.६५ कोटींचा दिला हिशोब
हेही वाचा…मोठी बातमी..! खोके सरकारची थंडी बिअर योजना! बिअरची विक्री वाढविण्यासाठी सरकारने स्थापन केली समिती
हेही वाचा…विवस्त्र महिलेचा धावतांना व्हिडीओ व्हायरल, भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल
हेही वाचा…नेत्यांना मराठा समाजाकडून गावबंदी, शिंदेंच्या ‘या’ मंत्र्यांना गावकऱ्यांनी अक्षर:श पळवून लावलं
हेही वाचा…मराठा समाजाबद्दल वक्तव्य करणं रामदास कदमांना भोवलं, ठाकरेंच्या शिवसैनिकाने चांगलचं सुनावलं