IMPIMP
Thackeray is aggressive after the attack on Sena office bearers Thackeray is aggressive after the attack on Sena office bearers

आमच्या जीवावर येत असेल, तर…; सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर ठाकरें आक्रमक

मुंबई :  शिवसैनिकांच्या अंगावर येत असेल तर खपवून घेणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. शिवसेनेच्या भायखल शाखेचे पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या गाडीवर काही जणांनी हल्ला केला होता. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे आता चांगलेच सक्रिय झाले आहेत.

“आम्ही आमचं सरकार मजबुतीने चालवतोय”; पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर 

पोलिसांनी राजकारणात पडू नका, आमचे काय करायचे ते आम्ही करू, जी लढाई आहे, ती लढू. पण जीवाशी खेळ होणार असेल, तर शांत राहू शकणार नाही. यापुढे शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागला तरी, तुम्ही सगळे जबाबदार राहाल. शिवसैनिकांच्या जीवावर येत असेल तर खपवून घेणार नाही. शिवसैनिकांचे रक्त सांडू नये, यासाठी मी स्वत: शांततेचे आवाहन केले आहे. हे राजकारण नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

“सध्या दोन जणांचे मंत्रीमंडळ असून दोघेच महाराष्ट्राचे मालक”; अजित पवारांचा खोचक टोला 

शिवसैनिकांवरील हल्ला हा सुडाच्या भावनेतून केला आहे. या हल्ल्यामागे कोण आहे, याचा तपास केला का नाही. पोलिसांना जमत नसेल, तर तुम्ही हात वर करा, मग शिवसैनिक बघतील, सरंक्षण कसे करायचे ते, असं देखील स्पष्ट शब्दांत पोलिसांना देखील उद्धव ठाकरे यांनी धारेवर धरलं आहे. मागील काही दिवसापासून उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बऱ्याच कार्यकर्त्यांना भेटत आहेत.

“..लवकरच शिल्लक यात्रा काढा”; मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला 

दरम्यान, मागील काही दिवसात भायखळा शाखा क्रमांक 208 च्या शिवसैनिकांच्या गाड्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. या हल्ल्यात बबन गावकर आणि विजय कामतेकर थोडक्यात बचावले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत एकप्रकारे इशाराच दिला आहे.

Read also