मुंबई : मुंबईत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेसला राम राम केल्यानंतर मुंबईतील ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी कॉंग्रेसची साथ सोडली आहे. मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असं त्यांनी ट्विट मधले म्हटले आहे. त्यातच आता त्यांनी यासंदर्भात खरं कारण सांगितलं आहे.
हेही वाचा…“राज्यात सध्या पुतण्यांचे दिवस..!” राज्यात आणखी एका ‘काका पुतण्यात’ रंगलं राजकारण
येत्या १० तारखेला माझी यासंदर्भात भूमिका स्पष्ट करणार आहे. काही गोष्टी घडल्या आहेत. त्या सांगितल्या नाही तर बंर होईल. परंतु काही गोष्टी माझ्या मनाला पटलेल्या नाहीत. आतापर्यंत कॉंग्रेसमध्ये मौन बाळगून होतो. परंतु या सर्व गोष्टी एका छोट्या सभेत सांगणार आहे. तसेच आज प्रत्येक समाजाला घेऊन जाण्याचं काम आजच्या घडीला अजित पवार करत आहेत. मात्र माझी भूमिका मी १० तारखेलाच स्पष्ट करणार असं बाबा सिद्दीकी म्हणाले.
हेही वाचा…कॉंग्रेससोबतचा 48 वर्षाचा प्रवास संपुष्टात..! मुंबईतील कॉंग्रेसचे ‘मास लीडर’ म्हणून ओळख, कोण आहेत बाबा सिद्दीकी ?
दरम्यान, झिशान सिद्दीकी यांनी काय निर्णय घ्यायचा ? तो त्यांनी ठरवायचं आहे. अजित पवार गटाबरोबर जाण्याचे माझे बॅनर लागले आहेत. मात्र लवकरच मी पत्रकार परिषद घेऊन याबाबत तुम्हाला कळवणार आहेत. तसेच छोट्या सभेत जिल्हा परिषद सदस्य, माजी नगरसेवक असतील त्यांच्यासह इतर काही नेते आम्ही ज्या पक्षात जाऊ त्या पक्षाची ताकद वाढवणार आहोत. असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना पक्ष सोडा, पक्षांतर करा, नाहीतर तुरूंगात जा,” ठाकरे गटाच्या माजी मंत्र्याला शिंदे गटाच्या धमक्या
हेही वाचा…“पुण्यात अजित पवार गटाने कार्यालयावर ताबेमारी केली तर..” जयंत पाटलांनी दिला थेट इशारा
हेही वाचा…“शिंदे गँग च्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा”, राऊतांचे सलग चार दिवस ट्विटवॉर
हेही वाचा….“राजकारणात बाप बदलण्याची नवीन पद्धत आली”, शरद पवार गटाचा जोरदार घणाघात
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह गेल्यानंतर आता पक्षाचा निधीही जाणार ? शरद पवार गटाला धक्का बसणार ?