मुंबई : राज्यात महामारी, ऑक्सिजन-लस-रेमेडीसीवर यांची कमतरता, मराठा आरक्षण, तौक्ते चक्रीवादळाने झालेले कोकण किनारपट्टीचे नुकसान, परमबीर सिंग आणि अनिल देशमुख, सचिन वाझे यांच्या वेगवेगळ्या संस्थांकडून सुरु असलेल्या चौकश्या यांवरून वातावरण तापलेले असतानाच, आता राज्यात अजून एका नवीन वादाला तोंड फुटले आहे.
या वेळी वादाच्या भोवऱ्यात पत्रकार गिरिश कुबेर यांनी लिहिलेले, ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ हे पुस्तक सापडले असून, पुस्तकातील छ. संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह अशा लिखाणावरून, लोकसत्ता’ या वृत्तपत्राचे संपादक गिरीश कुबेर यांनी देशाची माफी मागावी, तसेच राज्य सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी आणावी, अशी मागणी आता अनेक संघटनांकडून आणि राजकीय पक्षाकडून होऊ लागली आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनीदेखील आता या पुस्तकाला विरोध दर्शवला असून, त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये, “गिरीश कुबेर यांच्या “रीनैसंस द स्टेट” या पुस्तकामध्ये शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचे वाचनात आले. सर्वप्रथम पुस्तकाचे लेखक गिरीश कुबेर यांचा #जाहीर_निषेध,” असे म्हणत या पुस्तकाच्या मराठी लेखकाचा जाहीर निषेध केला आहे.
तसेच, “छत्रपती संभाजी महाराजांचे योगदान सर्वश्रुत आहे. काहितरी विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी, किंवा खोडसाळपणा करुन प्रसिद्धी मिळवण्यासाठी अश्या प्रकारचे संदर्भहीन लिखाण बरेच लोक करत असतात ; यापैकीच एक हे असावेत,” अशी टीका गिरीश कुबेर यांच्यावर करत, “रीनैसंस द स्टेट” या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी तसेच बाजारत विक्रीसाठी उपलब्ध झालेली ही सर्व पुस्तके शासनाच्या ताब्यात घ्यावीत. सरकारने या संवेदनशील विषयामधे लवकरात लवकर लक्ष घालावे व योग्य ती कायदेशीर कारवाई त्वरीत करावी,” अशी मागणी त्यांनी राज्य तसेच केंद्र सरकारकडे केली आहे.
Read Also :
- त्यांनी कोविड सेंटरमध्ये नर्तकांना नाचवले तरी देखील चालते; मात्र आम्ही कोविड सेंटरमध्ये यज्ञ केल्याने आमच्या विरोधात तक्रार
- ‘मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहणाऱ्या संभाजीराजेंसाठी वेळ नाही, पण अभिनेत्रींना भेटायला वेळ आहे’
- औरंगाबादच्या लॉकडाऊनवरून AIMIM आणि शिवसेना आमने-सामने
- रेड झोनमधील जिल्ह्यामंध्ये होम क्वारंटाईन बंद! ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!
- “भाजपने एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला महागात पडेल”