पुणे – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालये, मॉल्स, थिएटर्स सुरू करण्यात आले आहेत. 1 डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, आता त्याच दरम्यान कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. युरोपीय देशांमध्ये करोनाचा उद्रेक वाढत असताना अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात येत आहेत. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लावण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे
मी भाजपात प्रवेश करतोय, म्हणताच शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे झाले अवाक्
अजित पवार म्हणाले, पुण्यात परिस्थिती बरी आहे पण जागतिक पातळीवर नव्या प्रकारचा व्हायरसचा फैलाव होत आहे. त्याबद्दल फार वेगवेगळ्या प्रकारची मत आहेत. मुख्यमंत्री राज्यातल्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उद्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतील. काही निर्बंध पुन्हा आणावी लागतील असं त्या क्षेत्रातल्या मान्यवरांचे मत आहे.
आठमुठेपणा घेऊन एसटी सेवा ठप्प ठेवली तर कारवाई करावीच लागेल; अनिल परबांचा इशारा
आगामी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून अनेक नागरिक भारतात येण्याची शक्यता आहे. युरोपीय देशांमध्ये करोनाचा उद्रेक वाढत असताना तेथून येणारे प्रवासी बाधित असल्याचे आढळल्यास त्यांच्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तसेच या देशांमधील जिनोम सिक्वेन्सिंग अहवालही देण्याची मागणी करोना टास्क फोर्सकडे केली आहे. सध्या रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी या देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाचा फैलाव वेगाने होत आहे. या देशांमध्ये करोनाचे नवा व्हेरिएंट आढळल्यास त्यावर देखरेख ठेवणे गरजेचे आहे
Read Also :
- भाजपला मोठं खिंडार; भाजपमध्ये गेलेल्यांची लवकरचं घरवापसी होणार…
- नवाब मलिक यांची भूमिका ड्रग माफियांसाठी फायदेशीर ठरली; निलेश राणेंचा सनसनाटी आरोप
- मार्च एप्रिलमध्ये भाजप-शिवसेनेचे राज्यात सरकार स्थापन होईल – रामदास आठवले
- एसटी संप फुटला आहे या निव्वळ अफवाच; संजय राऊत, शरद पवारांविरोधात सदावर्तेंचा हल्लाबोल
- संप मागे घेतला तरच एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करणार; अनिल परबांचा कामगारांना इशारा