मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा गेला तीन आठवड्यांपासून बेमुदत संप सुरु आहे. एसटीचे विलगीकरण आणि पगारवाढ या दोन मुद्द्यांवर एसटीचे कर्मचारी आझाद मैदानात आणि प्रत्येक जिल्ह्यातील डेपोंमध्ये ठाण मांडून बसले आहेत. आता सरकारनेही दोन पाऊले पुढे येत कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा घोषणा केली आहे आणि कर्मचाऱ्यांनी संप मिटवण्याची भूमिका घ्यावी असं देखील म्हटलं आहे.
कोल्हापूरात काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध; भाजपच्या अमल महाडिकांची निवडणूकीतून माघार
संपाला पाठींबा देणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार, नेते गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील आता कर्मचाऱ्यांना समजून घ्यावे असं म्हटलं आहे आणि त्यांनी संपातून माघार घेतली आहे.
पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार- नाना पटोले
दुसऱ्या बाजूला काही कर्मचारी हे कामावर रुजू झाले आहेत. मात्र आझाद मैदानावर अद्यापही काही कर्मचारी तहान मांडून बसले आहेत. त्याचे नेतृत्व ऍड. गुणरत्न सदावर्ते करत आहेत. आज गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारवर तोफ डागली आहे. एसटी कर्मचारी शुक्रवारपर्यंत कामावर न परतल्यास सेवा समाप्तीची कारवाईचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता. परंतु, आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. सरकारने कितीही दबावतंत्राचा अवलंब केला तरी विलीनीकरणाची मागणी पूर्णकेल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा गुणरत्न सदावर्ते यांनी घेतला आहे.
शिवसेना नेते अर्जुन खोतकरांच्या बंगल्यावर छापा; किरीट सोमय्यांच्या आरोपावर ED ‘अॅक्शन मोड’मध्ये
संजय राऊत शिवसेनेचे नेते आहेत आणि संसदीय सदस्य आहेत. त्यांनी माझ्याबद्दल बोलताना थोडेसे तोंडावर नियंत्रण ठेवावे. अन्यथा संजय राऊत यांना आगामी काळात कायदेशीर टोल्यांना सामोरे जावे लागेल. संजय राऊतांमध्ये इतकी हिंमत असेल तर त्यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोणत्याही विभागात, कधीही चर्चेसाठी बोलवावे. त्यांच्याशी समोरासमोर चर्चेची माझी तयारी आहे. राऊत हे शरद पवारांचा आवाज आहेत. एकदा तरी एसटी कामगारांची विचारपूस करायला आले असते, तर त्यांना मानले असते, अशी टीका देखील सदावर्ते यांनी केली आहे.
Read Also :
- संप मागे घेतला तरच एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करणार; अनिल परबांचा कामगारांना इशारा
- संपाचा हट्ट जर कायम असेल तर नेत्यांनी कर्मचाऱ्यांच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी – संजय राऊत
- एसटी संप कर्मचारी उपाशी, नेते तुपाशी; जितेंद्र आव्हाडांचे खळबळजनक ट्विट
- महेश लांडगे ‘ऑन प्रॅक्टिकल मोड’ : अधिकारी पिंपरी- चिंचवडकर आहेत; आयुक्तांचे ऐका अन् माझे फ्लेक्स काढून टाका!
- महापालिका आयुक्तांचे आदेश : आमदार महेश लांडगेंचे शहरातील सर्व फ्लेक्स काढून टाका!