वाशिम : शाळेत जात असताना एका शिक्षकाला अनोळखी आरोपींनी अडवून लोखंडी रॉडने जबर मारहाण केली आणि नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळले, ही घटना सोमवारी मालेगाव तालुक्यातील कोल्ही बोर्डडी सस्त्यावर घडली. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संताप व्यक्त करत आरोपींवर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा…शरद पवारांची मोठी खेळी, अजित पवारांचा एकेकाळचा कट्टर समर्थक शरद पवार गटात दाखल ?
सुनील ऊर्फ दिलीप धोंडुजी सोनवणे असे मृत शिक्षकाचे नाव असून ते मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. सोमवारी सकाळी ते दुचाकीने शाळेत जात असताना कोल्ही बोर्डी रस्त्यावर आरोपींनी त्यांना अडवले आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले. त्यानंतर आरोपींनी पळ काढला. बराच वेळ सोनवणे गंभीर अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून होते. नंतर त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. पंरतु त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
हेही वाचा…काॅंग्रेसची महत्वाची बैठकीत पुण्यातील आमदारांची दांडी, चर्चांना उधाण
दरम्यान, कोल्ही बोर्डी, जि. वाशिम येथे शाळेवर जात असताना एका शिक्षकाला अडवून त्याला मारहाण करून जीवंत जाळल्याची घटना घडली. हा प्रकार अतिशय दुःखद, दुर्दैवी आणि चीड आणणारा आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहखात्याकडे लक्ष नाही. गुन्हेगार निर्ढावले असून दिवसाढवळ्या गुन्हे करत आहेत. वाशिम जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक यांनी या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून गुन्हेगारांना गजाआड करावे. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मागणी केली आहे.
हेही वाचा…शिंदे गटाचा होणार भ्रमनिरास..! अजित पवार गटाला केंद्रात अन् राज्यात लागणार मंत्रीपदाची पुन्हा लॉटरी
हा गुन्हा शेतीच्या वादातून घडल्याची चर्चा असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. दरम्यान, सीसीटीव्ही चित्रण हाती लागले असून गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे जऊळका रेल्वेचे ठाणेदार प्रदीप राठोड यांनी सांगितले आहे.
कोल्ही बोर्डी, जि. वाशिम येथे शाळेवर जात असताना एका शिक्षकाला अडवून त्याला मारहाण करून जीवंत जाळल्याची घटना घडली. हा प्रकार अतिशय दुःखद, दुर्दैवी आणि चीड आणणारा आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहखात्याकडे लक्ष नाही. गुन्हेगार निर्ढावले असून दिवसाढवळ्या गुन्हे करत… pic.twitter.com/no3djhU2ZF
— Supriya Sule (@supriya_sule) October 10, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“ज्या दिवशी माझी बोलायची वेळ येईल, त्यावेळी मी या सर्वांना ‘न’ग्न’ करून टाकेन”, शिंदे गटाच्या आमदाराचा पारा चढला
हेही वाचा…“राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा,” ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी, अन् ‘या’ जिल्ह्यात तब्बल ३०९ कार्यकर्त्यांनी पवारांची साथ सोडली
हेही वाचा…“अजित पवार गटाकडून पवारांवर दुसऱ्यांदा केला गंभीर आरोप,” आयोगात जोरदार खडाजंगी
हेही वाचा…“पक्षावर एकच व्यक्ती वचर्स्व गाजवू शकत नाही”, अजित पवार गटाने आयोगात दिला ‘त्या’ प्रकरणाचा दाखला