पुणे : हिंदू महासंघाचे आनंद दवे यांचा प्रचार आता एका पक्षाच्या बाजूने तर एक पक्षाच्या विरुद्ध असा एकांगी सुरू आहे. हिंदू महासंघ जिंकावा म्हणून हा प्रचार सुरू नसून ,भाजपच्या हेमंत रासने यांच्याविरोधात सुरु आहे, असा आरोप हिंदू महासंघाचे कार्यकारणी सदस्य आणि ब्राह्मण महासंघाचे उपाध्यक्ष रोहित धोत्रे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
हेही वाचा..निवडणुक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती नाही, परंतु ‘या’ घटनेत ठाकरेंना मोठा दिलासा
धोत्रे म्हणाले, जसा जसा प्रचार पुढे गेला तसा आनंद दवे यांनी एकांगी प्रचार सुरू केला. त्यांच्याकडून मविआचा अजेंडा फॉलो होत आहे. भाजपचा उमेदवार पडावा म्हणून हा प्रचार सुरू आहे. प्रचाराच्या काळात भाजपकडून एकत्र वेगळे न लढता एकत्र लढवू अशी विचारणा झाली होती.
हेही वाचा.“काॅंग्रेसला कसब्यात आणलं तर तुमचाच फायदा होणार”, प्रणिती शिंदेंची धंगेकरांसाठी सभा
प्रचाराच्या काळात पदाधिकाऱ्यांना विचारात न घेणे, भाजपचा हिंदू मतदार तोडणे अशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे मी दवे यांचा प्रचार करणे थांबविला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
Read also
- हेही वाचा.मला मुख्यमंत्री बनवण्यात लक्ष्मण जगतापांचं मोठं योगदान”, अश्विनी जगतापांच्या प्रचारसभेत शिंदेंचं विधान
- हेही वाचा.““शनिवार वाडा, सार्वजनिक गणेशोत्सव, पार्किंग व्यवस्था,” हेमंत रासनेंनी जाहीर केला आपला जाहीरनामा
- हेही वाचा..“पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद हजारो तरुणांचा सहभाग, ठिकठिकाणी जंगी स्वागत
- हेही वाचा…“राजकीय पक्ष म्हणजे आई, विधिमंडळ पक्ष म्हणजे बाळ,” ठाकरे गटाच्या वकिलांनी असं का म्हटलं?
- हेही वाचा..“शरद पवार असेपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होऊ शकत नाही”