मुंबई : केंद्रीय निवडणुक आयोगाने दिलेल्या निकालानंतर आता शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे. जन्मदात्या बापाचं नाव लावणं अपेक्षित असतांना राजकारणात मात्र बाप बदलण्याची नवीन पद्धत आली, अशी घणाघाती टिका शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी अजित पवारांवर केली आहे. त्यावर आता अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…कॉंग्रेसला मोठा झटका..! कॉंग्रेससोबत असलेला 48 वर्षाचा प्रवास ‘या’ नेत्याने संपवला, अजित पवार गटात करणार प्रवेश ?
सुप्रियाताईंनी सांगितले त्याप्रमाणे या सर्व निर्णयात अदृश्य शक्ती आहेच. मात्र देशभरात जनतेमध्ये जो संतो, आहे तो मतदानाच्या माध्यमातून बाहेर येणार आहे.जन्म देणाऱ्या बापाचं नाव लागलं पाहिजे, मात्र जन्म देणाऱ्या बापाचाच हा पक्ष असायला हवा. मात्र बाप बदलण्याची ही नवीन पद्धत सध्या राजकारणात सुरू असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…राज्यसभेवर भाजपकडून कोण ? वरिष्ठ पातळीवर महाराष्ट्रातून पाठविली ‘ही’ डझनभर नावं
त्यावर रोहिणी खडसे अजित दादा यांच्या जन्मदाता वडिलांचे नाव अनंतराव पवार आहे. राजकारणातील बापमाणुस वडिलांसमान असतात. रोहिणी मॅडम तुमच्या बाप बदलण्याचा वक्तव्यावरून तुमचे वडील आणि तुम्ही बाप बदलले असतील हो. आमच्या अजितदादाचे नाव अजितदादा अनंतराव पवार हेच नाव आहे. डोक्यात नीट ठेवा. असं रूपाली पाटील म्हणाल्या.
दरम्यान, खरे पाहिलं तर असा निकाल येणे अपेक्षित होता. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष वाढवला. त्या पक्षाचे चिन्ह काढण्यात आलं. त्यामुळे हे माहित होते की, आपल्या पक्षाचंही चिन्ह काढण्यात येईल. या निकालामुळे लोकशाही आता महाराष्ट्रात आणि भारतात शिल्लक राहिलेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शरद पवार हे आमची एकमेव ताकद आणि पक्ष आहे. पवार साहेब आमच्यासोबत असल्याने लढेंगे भी और जितेंगे भी असेही त्या म्हणाल्यात.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह गेल्यानंतर आता पक्षाचा निधीही जाणार ? शरद पवार गटाला धक्का बसणार ?
हेही वाचा…“राज्यात सध्या पुतण्यांचे दिवस..!” राज्यात आणखी एका ‘काका पुतण्यात’ रंगलं राजकारण
हेही वाचा…कॉंग्रेससोबतचा 48 वर्षाचा प्रवास संपुष्टात..! मुंबईतील कॉंग्रेसचे ‘मास लीडर’ म्हणून ओळख, कोण आहेत बाबा सिद्दीकी ?
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे उतरले मैदानात , कोकण दौऱ्यानंतर आता मुंबई अन् त्यानंतर मराठवाडा
हेही वाचा….“कार्यालयातून घड्याळ चिन्ह काढतांना पवार साहेबांच्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या डोळ्यात आलं पाणी”, व्हिडीओ व्हायरल