बीड : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक आंदोलने केलीत. अतिशय शांततेत व शिस्तीत सर्व आंदोलन करणारा माझा मराठा बांधव हिंसक आंदोलन करू शकणार नाही. काल जो प्रकार घडला तो मराठा समाजाने किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसून काही समाजकंटकांनी केला असावा. याबाबत आताच काही बोलणार नाही, तसेच योग्य वेळी पुराव्यानिशी बोलणार अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे शरद पवार गटातील बीड विधानसभा मतदारसंघाचे जिल्ह्याध्यक्ष संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे.
हेही वाचा…रेव्ह पार्ट्या आयोजित करणाऱ्या ‘एल्विस यादवा’ला पोलिसांनी घातल्या बेड्या, शिंदे-फडणवीसांवर काॅंग्रेसची जहरी टिका
बीड जिल्ह्यात मराठा आंदोलकांनाच्या वेळी मोठी हिंसाचार घडून आला. यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या बंगल्यासह संदीप क्षीरसागर यांचे घर, हॉटेल जाळून टाकण्यात आले. यावर घटनेवर आता प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दि.31 ऑक्टोबर 2023 रोजी बीड शहरात अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या. माझ्या राहत्या घरावर देखील हल्ला झाला. माझे मुल, पत्नी व सर्व कुटुंब यावेळी घरातच होते पण मतदारसंघातील व जिल्ह्यातील नागरिकांच्या व परमेश्वराच्या आशिर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप आहोत. असं संदीप क्षीरसागर यांनी सांगितलंय.
हेही वाचा…रेव्ह पार्ट्या आयोजित करणाऱ्या ‘एल्विस यादवा’ला पोलिसांनी घातल्या बेड्या, शिंदे-फडणवीसांवर काॅंग्रेसची जहरी टिका
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. त्यांच्या तब्येतीची माझ्यासह आपल्या सर्वांना काळजी आहे. सरकारने या बाबतीत तातडीने योग्य व सकारात्मक निर्णय घ्यायला हवा. सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीला सुरुवातीपासून मी पाठिंबा दिलेला असून शासन दरबारी पत्राद्वारे मी ही मागणी देखील केली होती. ही मागणी होऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावण्यासाठी मी देखील प्रयत्न करत राहणार आहे. असंही संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं आहे.
दि.31 ऑक्टोबर 2023 रोजी बीड शहरात अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या. माझ्या राहत्या घरावर देखील हल्ला झाला. माझे मुल, पत्नी व सर्व कुटुंब यावेळी घरातच होते पण मतदारसंघातील व जिल्ह्यातील नागरिकांच्या व परमेश्वराच्या आशिर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप आहोत.
मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक…
— Sandeep Kshirsagar (@SRK_Speaks_) November 3, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“गृहमंत्री पद झेपत नसेल तर राजीनामा देऊन प्रचारासाठी मोकळं व्हा”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
हेही वाचा…“प्रकाश सोळंकेंना फोनाफोनी करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, त्याच फोनमुळे बंगला अन् गाड्या पेटवल्या
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट”, वडेट्टीवारांचा हल्लाबोल
हेही वाचा…“खासदार सुनिल तटकरे यांना तात्काळ निलंबित करा,’ सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मोठी मागणी
“कितीही वेळा हिनवून ही तुम्हीच मराठा आरक्षणाचा वजीर आहात”, अन् फडणवीसांसाठी आमदार सरसावले