पुणे : येत्या २ मार्च रोजी राज्य सरकारचा नमो महारोजगार मेळावा बारामतीत होत आहे. या कार्यक्रमाला सुरूवातीला शरद पवारांना निमंत्रण देण्यात आलं नाही. त्यानंतर शरद पवारांनी गुगली टाकत थेट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. त्याची राजकारणात जोरदार चर्चा सुरू होती. परंतु यातच आता व्यस्त कार्यक्रमामुळे येऊ शकणार नाहीत. अशा आशायचं पत्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाठवलं आहे. तर अजित पवारांच्या सांगण्यावरून शरद पवारांचं निमंत्रण नाकारण्यात आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
हेही वाचा…“४ कोटीची थकबाकीतून फक्त २५ लाख भरले, राणेंना वेगळा न्याय अन् पुणेकरांना वेगळा,” विरोधकांचा सवाल
खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना बारामती दौऱ्यात भोजनाचे निमंत्रण दिले आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवारांना लिहून व्यस्त कार्यक्रमामुळे येणे शक्य नसल्याचे कळवले आहे. यामागे अजित पवार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात सध्या जोरदार आरोप-प्रत्त्यारोप होतांना दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
हेही वाचा…“तर तटकरेंचा 1 लाख 20 हजार मतांनी पराभव होईल”, रायगडमध्ये अजित पवारांना बसणार मोठा धक्का ?
दरम्यान, राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार क्विचितच एका व्यासपीठावर येतांना दिसत आहेत. यातच आता बारामतीत होऊ घातलेल्या कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांना निवास स्थानी चहापानासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. यासंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देखील पाठवलं आहे.
शरद पवार यांनी पाठवलेल्या पत्रात असं म्हटलंय की, ०२ मार्च २०२४ रोजी बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त आपण येत आहात. या कार्यक्रमासाठी संसद सदस्य या नात्याने मला आणि सौ. सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल. तसेच महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी बारामती येथील मैदानात करण्यात येत असल्याने अध्यक्ष या नात्याने अतिथी निवासात चहापानासाठी आपणास निमंत्रीत करीत आहोत.
READ ALSO :
हेही वाचा…“महायुती सरकारमध्ये हमरी तुमरी,” शिंदे गटाचे दोन्ही नेत्यांमध्ये धक्काबुक्की, विरोधकांची सडकून टिका
हेही वाचा…शिंदे गटातील दोन आमदार विधीमंडळाच्या लॉबीतच भिडले, दादा भुसे आणि महेंद्र थोरवेंची एकमेकांना धक्काबुक्की
हेही वाचा…अजितदादांचा लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीची मोठी घोषणा
हेही वाचा…अजितदादांचा लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीची मोठी घोषणा
हेही वाचा…स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लोकसभा नंतरच ? मंत्रिमंडळात काय निर्णय घेतला ?