रायगड : लोकसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे. तसा सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांतील विसंवाद समोर येऊ लागले आहेत. लोकसभेच्या जागा वाटपावरून तुन्ही पक्षांत असलेले मतभेद समोर येण्यास सुरूवात झाली आहे. याचा प्रत्य रायगड जिल्ह्यात येत आहे. रायगड लोकसभा मतदारसंघांवर तिन्ही घटक पक्षांनी दावा सांगितला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. परंतु त्याआधी विद्यमान खासदार सुनील तकटरे यांच्या विरोधात ठाकरे गटाने रणशिंग फुंकलं आहे.
हेही वाचा……दादा स्विकारणार का शरद पवारांचं निमंत्रण ? नमो महारोजगार मेळाव्यावरून रंगणार मानापमान नाट्य
महाविकास आघाडीकडून रायगड लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी ठाकरे गटाकडून अनंत गीते यांचं नाव चर्चेत आलं असून त्यांनी यासाठी तयारीही केली आहे. अलिकडेच ठाकरेंनी देखील रायगड लोकसभा मतदारसंघात जाहीर मेळावे घेतले. या मेळाव्यातून ठाकरेंनी सुनील तटकरे यांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा…“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील डुप्लिकेट आणा!” सभागृहात वडेट्टीवार सरकारवर संतापले
तर दुसऱ्या बाजूला अनंत गीते यांना रायगड लोकसभा मतदारसंघाबाबत मोठा दावा केला आहे. सुनील तटकरे यांच्यात हिमंत असेल तर त्यांनी निवडणूक लढवावी. असं खुलं आव्हान गिते यांनी दिले आहे. परंतु त्याआधी सुनील तटकरे यांनी निवडणुक लढवली तर त्यांचा १ लाख २० हजार मतांनी पराभव होईल. असा भाजपचा सर्व्हे सांगतो. असा दावाही केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“लोकसभा निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवून आपला उमेदवार निवडून आणा”
हेही वाचा…लोणावळ्यात अजित पवारांना मोठा धक्का, तब्बल १३७ पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामा, पुढची दिशा ठरली ?
हेही वाचा…लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला जाहीर, २०, १८, १० जागावाटप होणार
हेही वाचा…“तर सामुहिक कट रचून आमची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल करू”, जरांगेंनी पुन्हा दिला इशारा
हेही वाचा…ठाकरे गटाच्या खासदाराच्या मुलीची युवासेनेत एंन्ट्री, ठाकरे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर