पुणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पक्ष बांधणी करण्यास सुरूवात झाली आहे. यावरून अनेकांची उचलबांगडी करण्यात आलीय तर अनेकांना नवी संधी देण्यात आली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला काही पदाधिकारी नव्या नियुक्त्यावरून नाराज असल्याचं बघायला मिळत आहेत आणि याच नाराजीतून जवळपास १३७ पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा…ठाण्यात दिघेंच्या दोन शिष्यांमध्ये लोकसभेची लढाई ? महायुतीचा उमेदवार ठरला ?
राष्ट्रवादी मावळ तालुका पक्षनेता यांनी लोणावळा युवक शहराध्यक्ष पद दुसऱ्याला दिले आणि पक्ष संघटनेत डावलत असल्याचा आरोप लोणावळा युवक शहाराध्यक्ष विनोद होगले यांनी केला आहे. त्यामुळे विनोद होगले यांच्यासह राष्ट्रवादीच्या १३७ पदाधिकारी महिला, युवती तरूण यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाच्या मावळमधील आणि पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज ज्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला ? ठाकरे, शरद पवार, कॉंग्रेस किती जागा लढवणार ?
विनोद होगले यांचं लोणावळा युवक शहाराध्यक्ष पद काढून मंगेश मावकर यांच्याकडे देण्यात आले आहे. परंतु त्यांना काहीही अनुभव नाही असं असतानाही त्यांना संधी दिली आहे. आम्ही राष्ट्रवादी सोबत होतो. मात्र आम्हाला निर्णय घ्यावा लागला. लवकरच पुढचं पाऊल उचणार आहोत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे मावळचे आमदार सुनील शेळके यांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, लोणावळ्यात भुंकप होताच राष्ट्रवादीचे जिल्ह्याध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी लगेच धाव घेतलीय. त्यांनी राजीनामा दिलेल्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. त्यामुळे राजीनामा दिलेले कार्यकर्ते लवकरच निर्णय घेणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला जाहीर, २०, १८, १० जागावाटप होणार
हेही वाचा…“तर सामुहिक कट रचून आमची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल करू”, जरांगेंनी पुन्हा दिला इशारा
हेही वाचा…ठाकरे गटाच्या खासदाराच्या मुलीची युवासेनेत एंन्ट्री, ठाकरे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर
हेही वाचा……दादा स्विकारणार का शरद पवारांचं निमंत्रण ? नमो महारोजगार मेळाव्यावरून रंगणार मानापमान नाट्य
हेही वाचा“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील डुप्लिकेट आणा!” सभागृहात वडेट्टीवार सरकारवर संतापले