मुंबई : राज्य सरकारचं अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यातच मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या खोट्या स्वाक्षरी आणि शिक्के असलेले बनावट निवेदने आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील डुप्लिकेट आणा, असा संताप यावेळी वडेट्टीवारांनी व्यक्त केलाय.
हेही वाचा…निलेश लंके डबल रोलमध्ये, ऐनवेळी घड्याळ सोडून तुतारी फुंकून भाजपचा गेम करणार?
मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या खोट्या स्वाक्षरी आणि शिक्के असलेली बनवाट निवेदने राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात सापडले असून ही घटना गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पॉंईंट ऑफ इनफॉर्मेशनच्या माध्यमातून करण्यात आली.
हेही वाचा…शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत करणार प्रवेश, कोल्हेंच्या विरोधात महायुतीची रणनिती ठरली
एक तोतया अधिकारी स्वतः फाईल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे जायचा आणि स्वाक्षरी घेऊन यायचा. आठ महिन्यात त्या अधिकाऱ्याने अनेक अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, शासकीय दस्ताऐवज यांमध्ये हस्तक्षेप केले. तो अधिकारी खरा आहे की खोटा विशेष कार्यकारी अधिकारी आहे हे देखील मुख्यमंत्र्याना माहीत नव्हते ही अतिशय दुर्दैवी आणि चिंतेची बाब आहे. हा सर्व गोंधळ बघता राज्यात किती मोठ्या प्रमाणात अनागोंदी सुरू आहे सर्व जनतेला दिसत आहे.हे सर्व नेमकं चाललंय काय, याकडे शासन जबाबदारीने बघणार आहे की नाही? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.
READ ALSO :
हेही वाचा…ठाण्यात दिघेंच्या दोन शिष्यांमध्ये लोकसभेची लढाई ? महायुतीचा उमेदवार ठरला ?
हेही वाचा…महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला ? ठाकरे, शरद पवार, कॉंग्रेस किती जागा लढवणार ?
हेही वाचा…रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेवरून भाजप अन् शिंदेंचे नेते भिडले, महायुतीकडून कुणाला मिळणार उमेदवारी ?
हेही वाचा…जरांगे पाटील जालन्यातून लोकसभेचे उमेदवार, वंचितने आघाडीसमोर ठेवला ‘या’ २७ जागांचा प्रस्ताव
हेही वाचा…“ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी २०० कोटींचा विशेष निधी ;” मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश