मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाची चर्चा करण्यात आली. यावेळी वंचितला देखील बैठकीसाठी महाविकास आघाडीने आमंत्रण दिले होते. यावेळी वंचितने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकूण २७ जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीकडे मुंबईत येथील बैठकीत एकूण चार प्रस्ताव मांडले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभिजित वैद्य यांना आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात यावे, तसतेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान १५ ओबीसी उमेदवार असावेत.
हेही वाचा…पुणे पालिकेचा निलेश राणेंना मोठा दणका, पावणे चार कोटींची थकबाकी, मालमत्ता केली जप्त
महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाने असे लेखी वचन दिले पाहिजे की, पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपुर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपमध्ये सामील होणार नाही. तसचे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान ०३ अल्पसंख्यांक उमेदवार असावेत, असा प्रस्ताव वंचितकडून प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवान पुंडकर यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“आढळरावांना राष्ट्रवादीत घेतलं तर राजकारण सोडून घरी बसणार,” अजित पवारांच्या आमदाराची उघडउघड नाराजी
यातच वंचित बहुजन आघाडीची कुठल्याही पक्षाशी आघाडी नसतांना वंचितने ज्या मतदारसंघात निवडमुकीची पुर्ण ताकदीने तयारी केली होती. त्या लोकसभा मतदारसंघाची यादी देण्यात आली आहे. यामध्ये एकूण २७ लोकसभा मतदारसंघाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यामध्ये अकोला, अमरावती, नागपुर, भंडारा-गोंदिया, चंद्रपुर, हिंगोली, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, सोलापुर, माढा, रावेर, दिंडोरी, शिर्डी, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पुर्व, रामटेक, सातारा, नाशिक, मावळ, धुळे, रावेर, नांदेड बुलढाणा, वर्धा या जागांचा समावेश आहे.
Taking into account the hide and seek tactics and condescending attitude of the MVA towards VBA, we had prepared a list of constituencies where we had invested and prepared ourselves to contest with full force if the MVA and VBA alliance doesn’t take place.
Now that MVA has… pic.twitter.com/YfHCQY43vZ
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) February 28, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी २०० कोटींचा विशेष निधी ;” मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश
हेही वाचा…निलेश लंके डबल रोलमध्ये, ऐनवेळी घड्याळ सोडून तुतारी फुंकून भाजपचा गेम करणार?
हेही वाचा..शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत करणार प्रवेश, कोल्हेंच्या विरोधात महायुतीची रणनिती ठरली
हेही वाचा…अक्षय कुमार अन् विरेंद्र सेहवाग लोकसभा निवडणुक लढवणार, पक्ष आणि मतदारसंघही ठरला
हेही वाचा…अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा मोठा ग्रुप भाजपात दाखल, कॉंंग्रेसला नांदेडमध्ये मोठा फटका