नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत अबकी बार चारसो पार अशी घोषणा देत भाजपने मोठी तयारी सुरू केली आहे. यासाठी भाजपने आता बॉलिवुड तसेच क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींची चाचपणी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता सिनेअभिनेते अक्षय कुमार आणि प्रसिद्ध क्रिकेटपट्टू विरेंद्र सेहवाग यांच्या नावाचीही सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…शिरूर मावळला भरघोस निधी तर पिंपरी चिंचवड अन् पुणे शहाराला ठेंगा, अजित पवार पालकमंत्री असूनही…
दिल्लीत लोकसभेच्या एकूण सात जागांसाठी आपने कॉंग्रेससोबत आघाडी केली आहे. तर भाजपने देखील दिल्लीच्या सातही जागांवर आपले उमेदवार उतरवणार असल्याची रणनिती आखली आहे. यातच दिल्लीतील सात जागांपैकी उत्तर-पुर्व, चांदनी चौक, उत्तर-पश्चिम आणि नवी दिल्ली या जागा सर्वाधिक चर्चेत आल्या आहेत. यातच आता दिल्लीतून अक्षय कुमार आणि विरेंद्र सेहवाग यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…शिंदेंच्याच मंत्री अन् खासदारामध्ये मोठा वाद, मोदींच्या सभेआधी भावना गवळी अन् राठोड यांच्यात बॅनरवॉर
यातच इशान्य दिल्लीतून विद्यमान खासदार आणि दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष मनोज तिवारी यांना तिसऱ्यांदा जागेवरून तिकीट मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. चौंदणी चौक मतदारसंघाबाबतही संभ्रम असून कोविड काळातील निष्क्रियता आणि वय यामुळे विद्यमान खासदाराला संधी मिळू शकली नाही.
दरम्यान, पुर्व दिल्लीतून विद्यमान खासदार आणि स्टार क्रिकेटर गौतम गंभीरला पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता विरेंद्र सेहवाग आणि अक्षय कुमार यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे विरेंद्र सेहवाग आणि अक्षय कुमार काय भूमिका घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा मोठा ग्रुप भाजपात दाखल, कॉंंग्रेसला नांदेडमध्ये मोठा फटका
हेही वाचा…पुणे पालिकेचा निलेश राणेंना मोठा दणका, पावणे चार कोटींची थकबाकी, मालमत्ता केली जप्त
हेही वाचा…“आढळरावांना राष्ट्रवादीत घेतलं तर राजकारण सोडून घरी बसणार,” अजित पवारांच्या आमदाराची उघडउघड नाराजी
हेही वाचा..चव्हाणांचं अस्तित्व अन् भाजपा गर्व मिटवण्यासाठी नांदेडमध्ये आखली रणनिती, खासदाराचीच बहिण कॉंग्रेसमध्ये दाखल ?
हेही वाचा…२३ जागांसाठी भाजपकडून निरिक्षक, मित्रपक्षांसमोर भाजपने टाकली गुगली, लोकसभेच्या ‘या’ जागा सोडल्या