पुणे : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात शिरूर आणि मावळ परिसरासाठी कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. मावळातील एकवीरा देवस्थान विकास लोणावळा लोहमार्ग तिसरी-चौथी लाईन, पुणे-नाशिक लोहमार्ग भुसंपादन, औंध रूग्णालय विकास, रिंग रोडला तरतुद केली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला पिंपरी-चिंचवड शहरातील एकाही प्रकल्पासाठी निधी देण्यात आलेला नाही. पवना, मुळा आणि इंद्रायणी नंद्यासाठीही तरतुद नसल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा…“अंतरवाली सराटीच्या दंगलीत टोपेंच्या कारखान्यातून दगडं आणलीत,” भाजपचा आरोप, राजेश टोपेंची प्रतिक्रिया म्हणाले…
शिरूर लोकसभा आणि मावळ लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. त्यासाठी आता अर्थसंकल्पात भरखोस निधींची तरतुद करण्यात आलीय. तर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार असून तेच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीही आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला आणि मावळ परिसराला काय मिळणार याची उत्सुकता होती, परंतु पवार यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात पिंपरी-चिंचवड सह पुणे शहारांसाठी फारसा निधी दिलेला नाही.
हेही वाचा…“फसव्या घोषणा अन् पोकळ आश्वासनांची रेलचेल, अर्थसंकल्प म्हणजे शिळ्या कडीला उत आणणारा “
पीएमआरडी चा रिंग रोड प्रकल्प प्रस्तावित असून मावळ, मुळशी आणि खेड परिसरात रिंग रोडचा काहीचा भाग येते यासाठी १० हजार ५१९ कोटी तरतुद केलीय. पुणे-लोणावळा मार्गिकेसाठी ५० टक्के निधी, लोणावळा येथे जागतिक दर्जाच्या स्कायवॉक प्रकल्पासाठी ३३३ कोटींची तरतुद, तर मावळातील एकवीरा देवी मंदिर विकास आता प्राधिकरणामार्फत होणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंच्याच मंत्री अन् खासदारामध्ये मोठा वाद, मोदींच्या सभेआधी भावना गवळी अन् राठोड यांच्यात बॅनरवॉर
हेही वाचा…मोदींच्या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी १२ कोटी रूपयांचा चुराडा, विरोधकांची सरकारवर जोरदार टिका
हेही वाचा..“ओबीसी आणि मुस्लिम एकत्र झाले तर आपण 48 पैकी 48 जागा जिंकु”, कुणी केला ‘हा’ मोठा दावा ? राज्यात तिसरी आघाडी ?
हेही वाचा…वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक, शिरूरची जागा राष्ट्रवादीच लढणार, महायुतीचा उमेदवार कोण ?
हेही वाचा…“मनोज जरांगेंना तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का ?” उद्धव ठाकरेंचा सरकारला खोचक सवाल