नांदेड : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. यातच अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशामुळे विद्यमान खासदार प्रतापराव चिखली यांची खासदारकी धोक्यात आल्याची चर्चा होती. परंतु भाजपने अशोक चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकी देऊन या चर्चांवर पुर्णविराम दिला. परंतु यातच आता प्रतापराव चिखलीकर यांची बहिण आशा शिंदे कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
हेही वाचा…वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक, शिरूरची जागा राष्ट्रवादीच लढणार, महायुतीचा उमेदवार कोण ?
नांदेड हा अशोक चव्हाणांसह कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांना ४ लाख ८६ हजार ८०६ मते मिळाली होती. तर अशोक चव्हाण यांना ४ लाख ४६ हजार ६५८ मते मिळाली. यामध्ये ४० हजार १३८ मतांचा फरक होता. तर तिसऱ्या क्रमांकावर वंचितचे यशपाल भिंगे यांना १ लाख ६६ हजार १९६ मते मिळाली होती. यातच आता अशोक चव्हाण भाजपसोबत गेले आहेत. त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपची अधिक पकड मजबुत झालीय. मात्र चव्हाण भाजपसोबत गेले असले तरी नांदेडचा मतदार हा कॉंग्रेससोबत आल्यास चिखलीकर यांचा पराभव अटळ आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत प्रतापराव चिखलीकर यांनी पुन्हा नांदेड लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी सांगितली आहे. मध्यंतरी अशोक चव्हाण यांच्या भाजपप्रवेशामुळे चिखलीकरांचा पत्ता कट होणार का ? अशीही चर्चा सुरू होती. परंतु भाजपने अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर चिखलीकरांना सुखद धक्का बसला. यातच आता प्रतापराव चिखलीकर यांच्या बहिण आशा शिंदे कॉंग्रेसमधून लोकसभा लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अपक्ष आमजाक श्यामसुंदर शिंदे यांच्या आशा शिंदे या पत्नी आहेत. तर प्रतापराव चिखलीकर यांच्या बहिण आहेत. यातच आज आशा शिंदे नाना पटोले यांची भेट घेणार असून चर्चा करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“मनोज जरांगेंना तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का ?” उद्धव ठाकरेंचा सरकारला खोचक सवाल
दरम्यान, प्रतापराव चिखली कर यांच्या बहिणी आशा शिंदे यांनी कॉंग्रेसमधून लोकसभा निवडणुक लढवली तर प्रतापराव चिखलीकर विरूद्ध आशा शिंदे असा सामाना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघापैकी नांदेड लोकसभेचीही रंगत मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. तर अशोक चव्हाण यांच्या प्रतिष्ठेची लढत समजली जाणार. त्यामुळे कॉंग्रेस अन् भाजपात आता मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…२३ जागांसाठी भाजपकडून निरिक्षक, मित्रपक्षांसमोर भाजपने टाकली गुगली, लोकसभेच्या ‘या’ जागा सोडल्या
हेही वाचा…शिरूर मावळला भरघोस निधी तर पिंपरी चिंचवड अन् पुणे शहाराला ठेंगा, अजित पवार पालकमंत्री असूनही…
हेही वाचा…शिंदेंच्याच मंत्री अन् खासदारामध्ये मोठा वाद, मोदींच्या सभेआधी भावना गवळी अन् राठोड यांच्यात बॅनरवॉर
हेही वाचा…मोदींच्या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी १२ कोटी रूपयांचा चुराडा, विरोधकांची सरकारवर जोरदार टिका
हेही वाचा..“ओबीसी आणि मुस्लिम एकत्र झाले तर आपण 48 पैकी 48 जागा जिंकु”, कुणी केला ‘हा’ मोठा दावा ? राज्यात तिसरी आघाडी ?