पुणे : पुणे महानगरपालिकेने गेले काही दिवस पुण्यात पैसे थकवले म्हणून कठोर कारवाई करण्याची सुरूवात केली आहे. ज्या ठिकाणी कोट्यवधी कर थकीत आहेत. त्यांच्यावर अशीही कारवाई करण्यात आली आहे. यातच भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यावर देखील पुणे महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे याची सध्या एकच चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…मोदींच्या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी १२ कोटी रूपयांचा चुराडा, विरोधकांची सरकारवर जोरदार टिका
पुण्यात भाजप नेते निलेश राणे यांच्या डेक्कन भागात असलेल्या आर डेक्न येथील व्यवसायिक जागेचा कर न भरल्याने ही जागा पालिकेकडून सील करण्यात आली आहे. मालमत्ता थकबाकीप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केलीय. या जागेबाबत ३ कोटी ७७ लाख ५३ हजार रूपयांची थकबाकी होती. सध्या पुणे महापालिका थकित करा प्रकरणी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करतांना दिसत आहेत.
हेही वाचा….“ओबीसी आणि मुस्लिम एकत्र झाले तर आपण 48 पैकी 48 जागा जिंकु”, कुणी केला ‘हा’ मोठा दावा ? राज्यात तिसरी आघाडी ?
दरम्यान, पुणे महापालिकेचे पैसे थकले असतील म्हणून त्यांनी कारवाई केली. त्यात गैर काही नाही. या जागेची थकबाकी भरली नसती तर त्याची वेगळी बातमी झाली असती. आता कारवाई झाली आहे आणि आम्ही थकबाकी भरणार आहोत. अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली आहे. डेक्कन कॉर्नर येथे राणेंच्या मालकीचा मॉल असून या मॉलची एकूण ५ कोटी ६० लाख रूपये थकबाकी होती. याबाबत पुणे महापालिकेने वारंवार पाठपुरावा केला होता. नोटीसदेखील पाठवण्यात आल्या होत्या. मात्र तरीही कर भरण्यात आला नसल्यानेही ही कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आढळरावांना राष्ट्रवादीत घेतलं तर राजकारण सोडून घरी बसणार,” अजित पवारांच्या आमदाराची उघडउघड नाराजी
हेही वाचा..चव्हाणांचं अस्तित्व अन् भाजपा गर्व मिटवण्यासाठी नांदेडमध्ये आखली रणनिती, खासदाराचीच बहिण कॉंग्रेसमध्ये दाखल ?
हेही वाचा…२३ जागांसाठी भाजपकडून निरिक्षक, मित्रपक्षांसमोर भाजपने टाकली गुगली, लोकसभेच्या ‘या’ जागा सोडल्या
हेही वाचा…शिरूर मावळला भरघोस निधी तर पिंपरी चिंचवड अन् पुणे शहाराला ठेंगा, अजित पवार पालकमंत्री असूनही…
हेही वाचा…शिंदेंच्याच मंत्री अन् खासदारामध्ये मोठा वाद, मोदींच्या सभेआधी भावना गवळी अन् राठोड यांच्यात बॅनरवॉर