नांदेड : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे नांदेडमध्ये कॉंग्रेसला मोठा फटका बसला आहे. तर भाजपात अशोक चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. यातच आता दिवसेंदिवस अशोक चव्हाण यांचे कॉंग्रेसचे समर्थक आता भाजपात प्रवेश करतांना दिसत आहेत.
हेही वाचा…शिंदेंच्याच मंत्री अन् खासदारामध्ये मोठा वाद, मोदींच्या सभेआधी भावना गवळी अन् राठोड यांच्यात बॅनरवॉर
ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखील बिलोली व कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच कुंडलवाडी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याप्रमाणे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अनेक कॉंग्रेस पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजपात सहभागी होऊन भारताच्या स्वप्नपुर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा…मोदींच्या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी १२ कोटी रूपयांचा चुराडा, विरोधकांची सरकारवर जोरदार टिका
अशोक चव्हाण यांनी नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी आज विस्तृत चर्चा केली. यावेळी सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तर अर्धापूर शहर व ग्रामीण भागातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी विधानपरिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…पुणे पालिकेचा निलेश राणेंना मोठा दणका, पावणे चार कोटींची थकबाकी, मालमत्ता केली जप्त
हेही वाचा…“आढळरावांना राष्ट्रवादीत घेतलं तर राजकारण सोडून घरी बसणार,” अजित पवारांच्या आमदाराची उघडउघड नाराजी
हेही वाचा..चव्हाणांचं अस्तित्व अन् भाजपा गर्व मिटवण्यासाठी नांदेडमध्ये आखली रणनिती, खासदाराचीच बहिण कॉंग्रेसमध्ये दाखल ?
हेही वाचा…२३ जागांसाठी भाजपकडून निरिक्षक, मित्रपक्षांसमोर भाजपने टाकली गुगली, लोकसभेच्या ‘या’ जागा सोडल्या
हेही वाचा…शिरूर मावळला भरघोस निधी तर पिंपरी चिंचवड अन् पुणे शहाराला ठेंगा, अजित पवार पालकमंत्री असूनही…