अहमदनगर : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अनेकांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गटात नेमकं कोण आहेत ? हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर हे चित्र बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या पोस्टरवर शरद पवार यांचे फोटो झळकल्याने याची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा..चव्हाणांचं अस्तित्व अन् भाजपा गर्व मिटवण्यासाठी नांदेडमध्ये आखली रणनिती, खासदाराचीच बहिण कॉंग्रेसमध्ये दाखल ?
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवारांचे कोणतेही फोटो न वापरण्याचा सल्ला देण्यात आला. असे असलं तरी अजित पवार गटातील आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांच्या उद्घाटनाचे पोस्टर्स सोशल मीडियावर सध्या फिरत असून यावर शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांचे फोटो लावण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यातच निलेश लंके आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही इच्छूक असल्याचे बोललं जात आहे. अशातच लंके दोन्ही गटासोबत डबल रोल खेळत आहेत का ? अशी चर्चाही राजकारणात सुरू झालीय.
हेही वाचा…२३ जागांसाठी भाजपकडून निरिक्षक, मित्रपक्षांसमोर भाजपने टाकली गुगली, लोकसभेच्या ‘या’ जागा सोडल्या
अजित पवार महायुतीत सामील होण्याच्या आधी विद्यमान खासदार सुजय विखे पाटलांच्या विरोधात निलेश लंके लोकसभेची निवडणुक लढवणार अशी चर्चा होती. तसेच निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके याही या निवडणुकीसाठी इच्छूक असल्याचं बोललं जात आहे. यावर एकाच घरात दोन मतप्रवाह असू शकतात. अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिलीय. अशातच भाजप आणि अजित पवार गट दोन्ही महायुतीत सत्तेत आहे. मात्र तरी देखील निलेश लंके आणि राणीताई लंके यांची विखे पाटलांच्या विरोधात निवडणुक लढणार असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर निलेश लंके भाजपचा गेम करणार का ? अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा..शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत करणार प्रवेश, कोल्हेंच्या विरोधात महायुतीची रणनिती ठरली
हेही वाचा…अक्षय कुमार अन् विरेंद्र सेहवाग लोकसभा निवडणुक लढवणार, पक्ष आणि मतदारसंघही ठरला
हेही वाचा…अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा मोठा ग्रुप भाजपात दाखल, कॉंंग्रेसला नांदेडमध्ये मोठा फटका
हेही वाचा…पुणे पालिकेचा निलेश राणेंना मोठा दणका, पावणे चार कोटींची थकबाकी, मालमत्ता केली जप्त
हेही वाचा…“आढळरावांना राष्ट्रवादीत घेतलं तर राजकारण सोडून घरी बसणार,” अजित पवारांच्या आमदाराची उघडउघड नाराजी