पुणे : मागील काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत महायुतीचा उमेदवार कोण असणार ? याची जोरदार चर्चा सुरू होती. महायुतीकडून शिरूरची जागा ही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळणार आहे. त्यानुसार अजित पवार गटाकडून शिरूर मतदारसंघात दौरे सुरू झाले आहेत. यातच काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली असून ही जागा राष्ट्रवादीच असल्याची यावेळी जाहीर करण्यात आले. तर याच अनुषंगाने आता शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…२३ जागांसाठी भाजपकडून निरिक्षक, मित्रपक्षांसमोर भाजपने टाकली गुगली, लोकसभेच्या ‘या’ जागा सोडल्या
येत्या दोन ते तीन दिवसात अजित पवार यांची चाकण याठिकाणी सभा पार पडणार आहे. या सभेत शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात शिवाजीराव आढळराव पाटील हेच तगडे उमेदवार महायुतीत असल्याचं सर्व्हेत समोर आल आहे. तसेच शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात दोनदा प्रतिनिधित्व केले असून त्यांचा मतदारसंघात दांडगा संपर्क देखील असल्याचे वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. त्यानुसार आता शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…शिरूर मावळला भरघोस निधी तर पिंपरी चिंचवड अन् पुणे शहाराला ठेंगा, अजित पवार पालकमंत्री असूनही…
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भोसरीचे आमदार महेश लांडगे, विलास लांडे तसेच प्रदीप कंड यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू होती. परंतु अलिकडेच करण्यात आलेल्या सर्व्हेत शिवाजीराव आढळराव पाटलांचं नाव अग्रस्थानी असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात आढळराव पाटीलच परफेक्ट असल्याची चर्चा महायुतीत सुरू झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अक्षय कुमार अन् विरेंद्र सेहवाग लोकसभा निवडणुक लढवणार, पक्ष आणि मतदारसंघही ठरला
हेही वाचा…अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा मोठा ग्रुप भाजपात दाखल, कॉंंग्रेसला नांदेडमध्ये मोठा फटका
हेही वाचा…पुणे पालिकेचा निलेश राणेंना मोठा दणका, पावणे चार कोटींची थकबाकी, मालमत्ता केली जप्त
हेही वाचा…“आढळरावांना राष्ट्रवादीत घेतलं तर राजकारण सोडून घरी बसणार,” अजित पवारांच्या आमदाराची उघडउघड नाराजी
हेही वाचा..चव्हाणांचं अस्तित्व अन् भाजपा गर्व मिटवण्यासाठी नांदेडमध्ये आखली रणनिती, खासदाराचीच बहिण कॉंग्रेसमध्ये दाखल ?