सिंधुदूर्ग : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सिंधुदूर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मागच्या निवडणुकीच्या वेळी ज्या जागा आम्ही जिंकल्या होत्या. त्या आम्हाला मिळाव्यात यासाठी शिवसेना गट आग्रही आहे. तर दुसऱ्या बाजूला आता रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपने देखील दावा सांगितला आहे.
हेही वाचा…अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा मोठा ग्रुप भाजपात दाखल, कॉंंग्रेसला नांदेडमध्ये मोठा फटका
काल उदय सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदूर्ग ही जागा शिवसेनेने लढली आहे. त्यामुळे ती जागा शिवसेनाच लढेल. शिवसेनेने जागा लढवावी, अशी माझी इच्छा आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असे सांमतांनी सांगितले आहे. तर दुसऱ्या बाजूला लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवित आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे. अशी भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
हेही वाचा…पुणे पालिकेचा निलेश राणेंना मोठा दणका, पावणे चार कोटींची थकबाकी, मालमत्ता केली जप्त
दरम्यान, पुढील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सांमत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. यातच आता महायुतीकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जरांगे पाटील जालन्यातून लोकसभेचे उमेदवार, वंचितने आघाडीसमोर ठेवला ‘या’ २७ जागांचा प्रस्ताव
हेही वाचा…“ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी २०० कोटींचा विशेष निधी ;” मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश
हेही वाचा…निलेश लंके डबल रोलमध्ये, ऐनवेळी घड्याळ सोडून तुतारी फुंकून भाजपचा गेम करणार?
हेही वाचा..शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत करणार प्रवेश, कोल्हेंच्या विरोधात महायुतीची रणनिती ठरली
हेही वाचा…अक्षय कुमार अन् विरेंद्र सेहवाग लोकसभा निवडणुक लढवणार, पक्ष आणि मतदारसंघही ठरला